घररायगडआधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत;  विद्यार्थ्यांच्या ‘आधार’चे शिक्षकांना टेन्शन 

आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत;  विद्यार्थ्यांच्या ‘आधार’चे शिक्षकांना टेन्शन 

Subscribe

रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९०२ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याचे काम सुरू आहे. ३१ मे हि शिक्षण विभागाने अंतिम मुदत दिली होती परंतु आधार अपडेट न झाल्याने आता शासनाने १५ जूनपर्यंत आधार अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  आधार कार्ड अद्ययावत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच शाळांना अनुदान दिले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे. आधार कार्ड अद्ययावत न केल्यास नव्याने अनुदानावर आलेल्या शाळांचे अनुदान थकणार आहे, तर जिल्हा परिषदेचे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. विशेषतः प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची आधार अद्ययावत करण्याची धडपड सुरू आहे. रायगड जिल्ह्यात एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९.३७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत झाले आहे.  

अलिबाग/ रत्नाकर पाटील

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता १५ जूनची मुदत देण्यात आली आहे. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. मात्र आधार वैधतेसाठी मुदत मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे संचमान्यता प्रक्रिया होऊ शकली नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची संचमान्यता आधार वैधतेनुसार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील तपशिलातील त्रुटी दुरुस्त करणे आदी प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचेही दिसून आले आहे. आधार वैधतेनुसार संचमान्यता केल्यास आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे कमी होण्याची भीती आहे.
रायगड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागात ५ लाख १६ हजार ३६०  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ४ लाख ६१ हजार ४५८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची पडताळणी करून ते वैध असल्याचे ठरवण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत, मात्र नाव, पत्ता, वय, फोटो यात त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून त्रुटी दूर करण्यात येत आहेत. अद्याप ५४ हजार विद्यार्थ्यांची आधार पडताळणी बाकी आहे. दरदिवशी साधारण दीड हजार आधारकार्डमध्ये दुरुस्ती केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आधार पडताळणी नुसार संच मान्यता करण्यात येईल. ३० नोव्हेंबर २०२२ हा दिनांक गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करताना संस्थेने काही तफावत निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्याने शहानिशा करून निर्णय घ्यावा, तसेच संबंधित प्रकरणे शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
– शरद गोसावी
प्राथमिक शिक्षण संचालक
तालुका    आधार लिंक विद्यार्थी       शिल्लक विद्यार्थी
श्रीवर्धन      ११२०२                       ३१९
म्हसळा        ७५०५                      ३८८
उरण           २९०१७                     २२२७
रोहा           २५५८०                      १००८
मुरूड          १०१३३                    ४०६
महाड           २७६९६                   १०१६
तळा             ३८४१                      १८८
पेण               ३०३९०                    ११९८
अलिबाग        ३२५७०                   १३७४
पोलादपूर        ५१२६                     २४८
कर्जत              ३९०७३                   २९७४
खालापूर          ३९२८७                    २९५०
पनवेल             १६५६०८                  ३७६०९
माणगाव           २३३००                   २१३५
सुधागड            १११३०                   ८६२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -