घर रायगड खोपोली नालेसफाई अंतिम टप्प्यात - मुख्याधिकारी अनुप दुरे

खोपोली नालेसफाई अंतिम टप्प्यात – मुख्याधिकारी अनुप दुरे

Subscribe

अतिवृष्टिमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे, नाले तुंडूब भरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे यांनी दोन महिन्यांपासून छोटे - मोठे नाल्याची साफसफाई सुरू केली. पूरपरिस्थिती निर्माण होणार्‍या प्रत्यक्षस्थळी तीन चार वेळा पहाणी करीत गाळकचरा उचलण्याचे आदेश ठेकेदाराला दिले. येत्या दोन दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्याधिकारी दुरे यांनी दिली.

खोपोली: अतिवृष्टिमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे, नाले तुंडूब भरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे यांनी दोन महिन्यांपासून छोटे – मोठे नाल्याची साफसफाई सुरू केली. पूरपरिस्थिती निर्माण होणार्‍या प्रत्यक्षस्थळी तीन चार वेळा पहाणी करीत गाळकचरा उचलण्याचे आदेश ठेकेदाराला दिले. येत्या दोन दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्याधिकारी दुरे यांनी दिली.
शहरात पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता पालिकेचे आरोग्य अणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील गटारे नाले,सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते.यावर्षीही अशा प्रकारची कामे सुरू केली आहेत. शहरातील भानवज-शास्त्रीय नगर येथून येणार्‍या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विनानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदी काही भागांमध्ये पावसाचे पाणी सखल भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. अशा काही भागातील असलेले नाले व मोठी गटारे यातील गाळ काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम हाती घेतले आहे.एकूण ५० कर्मचारी काम करीत आहेत.छोटे नाले आहेत तेथे मनुष्यबळाचा वापर केला जात आहे. तर मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी,मोकल,डपरचा वापर करीत कचरा,गाळ उचलला जात आहे.
मागील दोन महिण्यापासून स्वच्छता निरिक्षक प्रफुल्ल गायकवाड,सहाय्यक स्वच्छता निरिक्षक विशाल गोयल तसेच त्या- त्या भागातील मुकादम दिनेश गायकवाड,प्रतिक जाधव,विनोद सोनावणे,बबन वाघमारे, संदीप काळे,संदीप गाडे, शिवदास कांबळे,काशिनाथ गायकवाड,अशोक पवार, बनेश गायकवाड,सुपरवाइजर अतुल घोडके,महेश सोलंकी हे कार्यरत आहेत.

मागील दोन महिण्यापासून सातत्याने सर्वच प्रभागात ५० कर्मचारी काम करीत आहेत. २ते ३ वर्षापासून ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती होते. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करुन येणार्‍या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. नाले, गटारातून निघणारा गाळ,कचरा बाहेर रस्त्यावर पडून आहे, तो उचल्यासाठीचे आदेश दिले आहेत.
– अनुप दुरे
मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद

- Advertisement -

 

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -