घररायगडनिसर्गप्रेमींना साद घालतोय कोर्लई किल्ला

निसर्गप्रेमींना साद घालतोय कोर्लई किल्ला

Subscribe

काशिद समुद्र किनार्‍याकडे जाणार्‍या मार्गावर कोर्लई हे छोटेसे गाव लागते. या गावापासून काही अंतरावरच हा किल्ला आहे. इतर गडकिल्ल्यांच्या प्रमाणात पायथ्यापासून पंधरा मिनिटाच्या पायी प्रवासाने आपण किल्ल्यापर्यंत पोहचतो.

सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त दहावींच्या काहींच्या परिक्षा संपल्या सुद्धा आहेत. सुट्टीत कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येणार्‍यांना कोर्लई येथील पोर्तुगिज किल्ला आकर्षित करीत आहे. निळाशार समुद्र, चौल-रेवदंड्याच्या हिरव्यागार नारळी-फोफळीच्या बागा आणि वेडीवाकडी वळणे घेत अरबी समुद्राला जाऊन मिळणार्‍या कुंडलिका नदीचे मनमोहक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

काशिद समुद्र किनार्‍याकडे जाणार्‍या मार्गावर कोर्लई हे छोटेसे गाव लागते. या गावापासून काही अंतरावरच हा किल्ला आहे. इतर गडकिल्ल्यांच्या प्रमाणात पायथ्यापासून पंधरा मिनिटाच्या पायी प्रवासाने आपण किल्ल्यापर्यंत पोहचतो. किल्ल्यावर पोहचल्यानंतर चारीही बाजूने दिसणारे निसर्ग सौंदर्य आपल्याला आलेला थकवा नाहीसा करतो. एका बाजूला निळ्याशार सागरावर छोट्या-छोट्या होड्या दिसतात. तर एकीकडे आपण खाडी आणि सागर यांची भेट झालेली पाहतो. इथे एक उत्तराभिमुख चर्चचे अवशेष आहेत. शंकराचे मंदीर देखील आहे. आता आपण उत्तरेकडे वळतो.

- Advertisement -

सर्वप्रथम आपल्याला दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आत जावे लागते. पैकी समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सां दियागो आणि खाडीकडे असणार्‍या बुरुजाचे नाव आहे सां फ्रांसिस्को. इथे काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठा आहे. पश्चिम आणि उत्तर तटबंदीला तोफा सज्ज आहेत. इथे पुर्वी ७० तोफा आणि ८ हजार शिबंदी असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. उत्तरेला वळलो की आपण इथल्या माचीवर पोहोचतो. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रुज म्हणतात. ही अंदाजे ३ मीटरची लांब माची आहे. थोडक्यात हा पोर्तुगीज धाटणीचा किल्ला आपल्याला सहजच त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पाडतो. सध्या सुरु असलेली उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराई निमित्ताने प्री-विडींग शुटींगसाठी गर्दी वाढत आहे.

हा किल्ला मुख्य रस्त्यापासून काही अंतरावरच आहे. येथे बारमाही पर्यटनाला चांगली संधी असल्याने पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षातील कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी या किल्ल्यावरुन कुंडलिका खाडी आणि परिसराचे दृश्य मनाला लुभावणारे आहे.
– प्रशांत मिसाळ, सरपंच, कोर्लई ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -