Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर रायगड आमदार आदिती तटकरे यांचा विकासकामांसह जनतेशी संपर्क

आमदार आदिती तटकरे यांचा विकासकामांसह जनतेशी संपर्क

Subscribe

आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळे आणि तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने आयोजित विविध कार्यक्रमामंध्ये सहभाग घेतानाच काही विकासकामांचेही उद्घाटन केले. तळे तालुक्यातील मौजे गौळवाडी,म्हसळेतील मौजे कोलवट, पाष्टी, मांदाटणे, आंबेत नवीवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा,पालखी सोहळा,हळदीकुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यानिमित्ताने आयोजित भजन,कीर्तन सेवा,जागर सेवा, विद्यार्थी गुणगौरव, विविध सांस्कृतिक आदी कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या.

म्हसळे: आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळे आणि तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने आयोजित विविध कार्यक्रमामंध्ये सहभाग घेतानाच काही विकासकामांचेही उद्घाटन केले. तळे तालुक्यातील मौजे गौळवाडी,म्हसळेतील मौजे कोलवट, पाष्टी, मांदाटणे, आंबेत नवीवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा,पालखी सोहळा,हळदीकुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यानिमित्ताने आयोजित भजन,कीर्तन सेवा,जागर सेवा, विद्यार्थी गुणगौरव, विविध सांस्कृतिक आदी कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या.
मौजे फळसप बौद्धवाडी येथे बौद्धजन सेवा संघ,संघ मित्र महिला मंडळ,फळसप नवतरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून आमदार तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला ग्रामस्थ,महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

विकासकामांवर भर देण्याची ग्वाही
मौजे पांगलोळी,कुणबीवाडी येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या कुणबीवाडी सामाजिक सभागृह तसेच मौजे आमशेत येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत स्मशान शेड बांधणे व सुशोभीकरण कामाचे उद्घाटन आमदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील मंजूर आणि प्रस्तावित विकासकामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल, आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार तटकरे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -