घररायगड‘थर्टी फर्स्ट’च्या पाश्वर्र्भूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांची...

‘थर्टी फर्स्ट’च्या पाश्वर्र्भूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांची माहिती

Subscribe

उद्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून नियमांचे पालन करून नवीन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी येथे केले.कर्जत पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी सुरू आहे, या पाश्वर्र्भूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक झेंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे उपस्थित होते

कर्जत: उद्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असून नियमांचे पालन करून नवीन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी येथे केले.कर्जत पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी सुरू आहे, या पाश्वर्र्भूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक झेंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे उपस्थित होते.कर्जत पोलीस ठाण्यात १८३ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये ३०-३५ टक्के गुन्हे हे मालमत्ता चोरीचे आहेत, १०-१५ टक्के गुन्हे हे फसवणूकीचे आहेत, इतर गुन्हे आहेत. इतर तालुक्याच्या प्रमाणात कर्जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे, कर्जत पोलीस ठाण्यात सुमारे ५० कर्मचारी वर्ग असल्याचे सांगितले. इतर जिल्ह्यातील तरुण पोलीस दलात भरती होतात, मात्र त्या नंतर ते जिल्हा बदलीच्या मागे लागतात, त्यामुळे काही समस्या उद्भवतात. जास्तीत जास्त स्थानिक तरुणांनी पोलीस दलात भरती व्हावे असे आवाहनही झेंडे यांनी यांनी यावेळी केले.

मद्यपान करून गाडी चालविण्यास गुन्हा
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच हजार फार्म हाऊस आहेत, कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर नविन वर्षाचे स्वागत जोरात होण्याच्या शक्यता लक्षात घेवून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ डिसेंबर रोजी नाकाबंदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे, परवानगी शिवाय कोणताही कार्यक्रम करू नका,पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊस वर पोलिसांची नजर असणार आहे, मद्यपान करून गाडी चालविण्यासगुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गाड्या पेट्रोलिंग साठी राहणार आहेत, शासनाने नियम ठरवून दिले आहे त्याचे पालन करून नविन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन झेंडे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -