घररायगडरायगडमधील २ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी २ हजार २४३ गुन्ह्यांची उकल - पोलीस...

रायगडमधील २ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी २ हजार २४३ गुन्ह्यांची उकल – पोलीस अधीक्षक सोनमाथ गर्गे

Subscribe

रायगड जिल्हा पोलिसांच्या दमदार कामगिरीचा आलेख चढता आहे. सन २०२२ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख बजावण्यात रायगड पोलीस यशस्वी ठरले आहेत. रायगड पोलिसांच्या अखत्यारीत असणार्‍या २८ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या २ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी २ हजार २४३ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

रत्नाकर पाटील: अलिबाग
रायगड जिल्हा पोलिसांच्या दमदार कामगिरीचा आलेख चढता आहे. सन २०२२ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख बजावण्यात रायगड पोलीस यशस्वी ठरले आहेत. रायगड पोलिसांच्या अखत्यारीत असणार्‍या २८ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या २ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी २ हजार २४३ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांच्या दप्तरी आता केवळ ३४५ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. कर्तव्यदक्ष रायगड पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात ८७ टक्क्यापर्यंत मजल मारली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
रायगड जिल्हा पोलिसांच्या वार्षिक कार्याचा आढावा सादर करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , श्रीवर्धन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी , पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात सन २०२२ मध्ये २५८५ गुन्हे २८ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यापैकी २२४३ गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघडकीस आणायचे प्रमाण ८७ टक्के इतके आहे. दाखल असणार्‍या गुन्ह्यांपैकी ३४५ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित आहेत. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण १३.३४ टक्के इतके आहे. रायगड जिल्ह्याचे गुन्हे सबीटीकरणाचे प्रमाण ६८ टक्के इतके आहे. रायगड जिल्ह्यात ६४३२ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये एमपीडीए नुसार रायगड जिल्ह्यातील १ धोकादायक इसम यास १ वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये ४ गुन्हेगारी टोळ्यांना तर मुंबई पोलीस अधिनियम कलाम ५६ आणि ५७ नुसार १० जणांना रायगडातून हद्दपार करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील १ गुन्हेगारी टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

नोंदीत ३८ खुनांचे गुन्ह्यांपैकी ३५ गुन्ह्यांची उकल
रायगड जिल्ह्यात सन २०२२ मध्ये ३८ खुनांचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ३५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे ३० गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली आहे. रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रांतील पोलीस ठाण्यांमध्ये मालमत्ता विषयक ६७७ गुन्हे दाखल झाले. यापैकी ४३८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. शरीराविरुद्धचे ४४८ गुन्हे दाखल असून ४४७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. फसवणुकीच्या १८० दाखल गुन्ह्यांपैकी १४६ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून अतिप्रसंगाचे दाखल १०६ गुन्हे पोलिसांनी तपासात उघड केले आहेत. विनयभंगाचे दाखल असणार्‍या ११३ गुन्ह्यांपैकी ११० गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी महिलांना न्याय मिळवून दिला आहे. महिला, मुली आणि लहान मुलांचे अपहरण आणि अपनयन याबाबतचे १३३ गुन्हे जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. या दाखल गुन्ह्यांपैकी १२७ गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली आहे. असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

- Advertisement -

१ लाख ४८ हजार ५९४ वाहनचालकांवर कारवाई
रायगड जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी , घरफोडी आणि इतर चोर्‍यांमध्ये ६७७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापकी ४३८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये चोर आणि दरोडेखोरांनी ९ कोटी ९६ लाख ८ हजार १२४ रुपयांचा मालाची चोरी केल्याचे फिर्यादींमध्ये दाखल केले होते. या गुन्ह्यांची उकल झाल्यामुळे रायगड पोलिसांनी ६ कोटी ६४ लाख ८२ हजार १९ रुपयांचा मालमत्ता हस्तगत केला आहे. जुगाराच्या अड्ड्यावर २२० ठिकाणी कारवाया केल्या असून तेथून पोलिसांनी १ कोटी ११ लाख ४३ हजार ३२३ रुपयांचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात दारूबंदीच्या ७२६ कारवाया केल्या असून ६७ लाख १६ हजार ५७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध अग्निशस्त्राच्या ९ कारवाया केल्या आहेत. एनडीपीएस अंतर्गत १४ कारवाया कार्नाय्त आहेत. या कारवाईमध्ये ५७.४७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लाख ४८ हजार ५९४ वाहनचालकांवर कारवाई करून ९ कोटी ५७ लाख २९ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -