घररायगडपालीच्या प्रथम नगराध्यक्षा पालरेचा भाजपत दाखल

पालीच्या प्रथम नगराध्यक्षा पालरेचा भाजपत दाखल

Subscribe

पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा, माजी जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील,यांच्या उपस्थित गीता पालरेचा यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भाजपा, मुंबई कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला.

 

पाली: पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा, माजी जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष राजेश मपारा यांच्या उपस्थित गीता पालरेचा यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत भाजपा, मुंबई कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील,राजेश मपारा,भाजपा दक्षिण रायगड जिल्हा माजी अध्यक्ष महेश मोहीते, भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर,रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, राजेश कानडे, सुशील शिंदे, प्रकाश आवसकर, मिलिंद देशमुख, प्रदीप (दादू) गोळे, सागर मिसाळ, दिनेश काटकर, संजय घोसाळकर, सुधाकर मोरे, शेखर राऊत यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. पालरेचा यांच्या भाजप प्रवेशाबद्दल गेल्या अनेक दिवस सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले होते.
बॉक्स…
राजकीय गोटात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या गीता पालरेचा यांनी जिल्हा परिषद सदस्या आणि त्यानंतर पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सुधागड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, पालीतील नळ पाणी योजना, सुधागड तालुक्यातील वाड्या-पाड्यातील रस्ते, असंख्य गणेश भक्तांसाठी सोयी सुविधा पुरवणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तरुणांना शिक्षणाच्या सोयी पुरवणे यासारख्या मागण्यांसाठी गीता पारलेचा यांनी घड्याळ सोडून हातात कमळ घेतलेले आहे. या भाजपा प्रवेशामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. गीता पालरेचा यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाला मोठी ताकद मिळाली आहे.
————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -