घररायगडकिल्ले रायगड मार्गाच्या प्रवेशद्वारावर सिटी इमारतीचा कचरा

किल्ले रायगड मार्गाच्या प्रवेशद्वारावर सिटी इमारतीचा कचरा

Subscribe

मुख्य रस्त्यांवर हा कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे योग्य नियोजन न करणाऱ्या इमारत विकासकांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नातेखिंड येथील रायगड सिटी या इमारतीच्या बाबतीत शेजारील स्थानिक ग्रामस्थांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

महाड: निलेश पवार

शहरांचा विस्तार हा हळूहळू शेजारील ग्रामपंचायत हद्दीत वाढू लागल्याने याठिकाणी उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींमधील रहिवाशांकडून टाकला जाणारा कचरा ग्रामपंचायतीची डोकेदुखी झाली आहे. मुख्य रस्त्यांवर हा कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे योग्य नियोजन न करणाऱ्या इमारत विकासकांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नातेखिंड येथील रायगड सिटी या इमारतीच्या बाबतीत शेजारील स्थानिक ग्रामस्थांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

- Advertisement -

शहरांचा विस्तार हा हळूहळू शेजारील गावाकडे वळला आहे. गावांचे शहरीकरण होत आहे. गावातून पाच ते सात मजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील या इमारतींना जिल्हाधिकारी कार्यालयातील बिनशेती विभाग परवानगी देत आहे. ग्रामपंचायतीची कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता न पाहताच परवानग्या दिल्या जात असल्याने इमारत बांधकाम व्यवसायिक कचरा नियोजन न करताच इमारती उभ्या करत आहेत. यामुळे लाखो रुपये मोजून घर घेणाऱ्या रहिवाशांना रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ येते. महाड रायगड मार्गावर असलेल्या रायगड सिटी मधील रहिवाशांकडून महाड रायगड मार्गावर कचरा टाकून दिला जात असल्याची तक्रार इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या चाळके यांनी केली आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या प्रवेशद्वारावारच कचऱ्याचा ढीग दिसून येत असल्याने शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे देखील सक्षम यंत्रणा नसल्याने कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. ऐन रात्रीच्या सुमारास बाहेर फिरायला निघालेल्या राहिवाशांकडून हा कचरा टाकून दिला जातो असे राम चाळके यांनी सांगितले. यामुळे घरांजवळ सर्पाचा वावर वाढला असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे देखील अर्जात नमूद केले आहे.

 

- Advertisement -

कचरा विल्हेवाट करण्यासाठी योग्य नियोजन गरजेचे

महाड शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमधून शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शेजारील चांभारखिंड, शिरगाव, दादली, नातेखिंड, लाडवली, गोंडाळे, नडगाव, या गावांमधून आता चार ते सात मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वी कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत नव्हता मात्र आता इमारतीमधील रहिवास वाढल्याने गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर, नदी किनारी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कमी उत्पन्न असलेल्या या ग्रामपंचायतीकडून कचरा विल्हेवाट करण्यासाठी मोठे प्रकल्प उभे करणे शक्य नाही मात्र शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट करण्यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे असले तरी ग्रामपंचायत याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. १४ वित्त आयोगाकडून मिळणारा निधी देखील बांधकाम आणि उत्तर कामांवर वारेमाप खर्च होत आहे. ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिनशेती विभागाकडून इमारतींना बांधकाम परवानगी दिली जाते त्या विभाकडून परवानगी दिल्यानंतर त्याची पाहणी केली जात नसल्याने इमारत बांधकाम व्यवसायिक कचरा, सांडपाणी नियोजन न करताच घरे विकण्याचे काम करत आहे. यामुळे बहुतांश गावातून कचऱ्याची समस्या पुन्हा उभी राहिली आहे. याबाबत ज्या बांधकाम व्यवसायीकाकडून नियमांचे उल्लंघन झाले असेल तर कचरा व्यवस्थापन ग्रामपंचायत अधिनियम द्वारे कारवाई करणे अपेक्षित आहे.

प्लास्टिक वापराबाबत जनजागृती आवश्यक

महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान दिवंगत मंत्री आर.आर.पाटील यांच्या काळात प्रभावीपणे राबवले गेले होते. पुरस्कार मिळवण्याची स्पर्धा लागल्याने गाव चकचकीत केली जात होती. यामुळे महाड तालुक्यात २० हून अधिक ग्रामपंचायती गरम स्वच्छता अभियान पुरस्काराने सन्मानित झाल्या होत्या. मात्र आता याच ग्रामपंचायतिच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने कचरा विल्हेवाट याच बरोबर कमीतकमी प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. कचरा आणि सांडपाणी याचे नियोजन होत नसल्याने गटारातील पाणी थेट रस्त्यावर आणि कचरा रस्त्यालगत पडू लागला आहे. शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत होणाऱ्या इमारतींना कचरा व्यवस्थापन करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारी इमारत बांधकाम व्यवसायिकाकडून करून घेतली तरच ही समस्या सुटणार असल्याचे स्थानिक प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.

आपण रीतसर तक्रार ग्रामपंचायत गोंडाळे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप याबाबत कारवाई केलेली नाही. रायगड सिटी मधील रहिवाशी आपला कचरा रस्त्यावर आणून टाकत असल्याने सापांचा वावर वाढला असल्याने आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे – राम चाळके

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -