पिण्याचे पाणी,पोपटीसाठी मडक्याला पसंती; कुंभाराकडील काळ्या मातीच्या भांड्याला मागणी

मागील दोन आठवड्यांपासुन वातावरणात वाढत चाललेला तापमान लक्षात घेता अनेकांनी या गरमीपासून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे.याचाच एक भाग म्हणजे फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्या ऐवजी अनेकजण साधा मडक्यातील पाणी पिणे पसंत करत आहेत. तसेच पोपटीसाठी मडक्याला पसंती देत असल्याने कुंभाराने बनवलेल्या मातीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या माठाचा वापर लोप पावत चालला असल्याची भीती व्यक्त केली जात असली तरी कुंभाराने बनवलेली मातीची मडकी आणि भांड्यांचे भवितव्य धोक्यात नसल्याचेही अधोरेखित होत आहे.

पेण: मागील दोन आठवड्यांपासुन वातावरणात वाढत चाललेला तापमान लक्षात घेता अनेकांनी या गरमीपासून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे.याचाच एक भाग म्हणजे फ्रिजमधील थंडगार पाणी पिण्याऐवजी अनेकजण साधा मडक्यातील पाणी पिणे पसंत करत आहेत. तसेच पोपटीसाठी मडक्याला पसंती देत असल्याने कुंभाराने बनवलेल्या मातीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या माठाचा वापर लोप पावत चालला असल्याची भीती व्यक्त केली जात असली तरी कुंभाराने बनवलेली मातीची मडकी आणि भांड्यांचे भवितव्य धोक्यात नसल्याचेही अधोरेखित होत आहे.
काळ्या मातीची भांडी बनविण्यासाठी लागणारी माती,लाकडे,तुस, राखाडी या गोष्टी आताच्या औद्योगिक आणि डिजिटल युगात मिळणे कठीण झाले असल्याने कुंभारांच्या काळी माती भांड्यांच्या व्यवसायावर गदा आली असल्याचे वास्तव आहे. मात्र तरीही घेतला वसा सोडायचा नाही, या जिद्दीने हा कुंभार समाजातील अनेक जण मडकी आणि काळ्या मातीची भांडी बनवत आहेत. पेण, उरण, खालापूर, कर्जत आदी तालुक्यांमध्ये कुंभार समाजातील पुरुष, महिला काळ्या मातीची भांडी बनवत असल्याचे दिसून येते. तसेच काळ्या मातीची भांडी बनविण्यासाठी लागणार्‍या या वस्तू मिळत नाहीत. मात्र राजस्थान आदी राज्यातूनही मडकी येत असल्याने त्यांची खरेदी करीत हा व्यवसाय जीवंत ठेवण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे दिसून येत आहे.

मडक्यातील पाणी आरोग्यदायी
मधल्या काळात मडकी व्यवसाय लोप पावत चालला आहे असे वाटत होते, मात्र दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोना काळ आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनेकजण घशाला त्रास होउन सर्दी खोकल्याला सामोरे जण्यापेक्षा फ्रिजचा वापर कमी करुन आणि विजेचा वापर कमी करुन साध्या माठतील पाणी पिणे अधिक पसंत करत आहेत. मडक्यातील पाणी आरोग्यदायी अशि त्यामागील भावना आहे. तर अनेकजण जुन्या पद्धतीकडे पुन्हा एकदा पावले टाकत या मातीच्या माठांचा वापर करत करताना दिसत आहेत.

पोपटीसाठी मडक्यांचाच वापर
सध्या वालाच्या शेंगांचा सीजन असल्याने वालाच्या शेंगांची पोपटी रायगड जिल्ह्यात जोरदार चालू आहे. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मातीच्या मडक्यांची जोरदार विक्री सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा या मातीच्या मडक्यांमधे जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली असुन मोठा माठ तीनशे ते चारशे रुपये, माध्यम आकाराचा माठ अडीचशे ते तीनशे रुपये आणि लहान आकाराचा माठ दिडशे ते दोनशे रुपयांना विकले जात आहेत. मात्र थोड्या किमतीत वाढ जरी झाली असली तरी अनेकजण या मातीच्या मडक्यांकडेच आपले लक्ष केंद्रित करुन तेच विकत घेणे पसंत करत आहेत. पोपटीसाठी मडक्यांचाच वापर आवश्यक असल्याने सध्या हा धंदा तेजीत आहे.

पूर्वी असणारी अमाप जागा, मडकी बनविण्यासाठी वापरले जाणारे इतर लाकडे,माती, राखाडी, तूस आदी गोष्टी मिळेनासे झाले असले तरी आम्ही आमचा पूर्वापार व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बाहेरून मडकी आणुन हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. तयार मडकी आणत ती महाग मिळत आहेत,त्यामुळे इच्छा नसून देखील ग्राहकाला थोड्या चढ्या भावाने मडकी विकायला लागत आहेत, मात्र तरी देखील यंदा ग्राहकांचा मडकी विकत घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमोल कुंभार, मडकी विक्रेता

—–