घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भाजपा उमेदवारांची सातवी यादी जाहीर, पण उदयनराजे भोसले...

Lok Sabha 2024 : भाजपा उमेदवारांची सातवी यादी जाहीर, पण उदयनराजे भोसले अद्यापही वेटिंगवरच

Subscribe

सातारा : भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अमरावती लोकसभेतून खासदार नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे आता 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढलेल्या राणा 2024ची लोकसभा भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाने जाहीर केलेल्या सातव्या यादीत साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजच (ता. 27 मार्च) उदयनराजे भोसले यांनी ते सातारा लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले आहे. पण भाजपाच्या आजच्या यादीतही त्यांचे नाव नसल्याने यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. (Lok Sabha 2024: Seventh list of BJP candidates announced, but Udayanraje Bhonsle still waiting)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : साताऱ्यातून महायुतीचा उमेदवार ठरला, उदयनराजेंसाठी अजित पवारांची माघार

- Advertisement -

साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मागील चार दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. याबाबत स्वत: उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात आल्यानंतर माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जागेवर आपला दावा करत असून भाजपानेही साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना आश्वासन दिले आहे. त्यामुळे, साताऱ्यात नेमके तिकीट कोणाला मिळणार, या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज यादी जाहीर होईल, मी निवडणूक लढवणारच आहे, असे म्हणत उदयनराजेंनी उमेदवारीचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. पण, या यादीत केवळ अमरावतीच्या जागेवरील उमेदवार नवनीत राणा यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे, उदयनराजे अद्यपही वेटिंगवरच असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्यात पोहोचले. यावेळी साताऱ्याच्या सीमेवर म्हणजेच शिरवळ-निरा नदीजवळ समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात उदयनराजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले. तर जेसीबीत्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी उदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “साताऱ्यात लोकांनी केलेले स्वागत पाहून मन भारावून गेले आहे. कालही मी जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहे. तसेच, मला या भव्य स्वागतामधून कोणालाही इशारा द्यायचा नाही. सगळं काही ठरलेलं आहे. निवडणूक मी लढणारच आहे. साताऱ्यात कधीतरी यायचे होते. आज मुहूर्त मिळाला आणि पोहोचलो. समर्थकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत,” असे उदयनराजे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -