घररायगड‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामनवमी साजरी

‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामनवमी साजरी

Subscribe

मुरुड शहरासह तालुक्यामधील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत राम नवमी तथा प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी एकदरा गावात श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्यात आला.दरम्यान जिल्ह्यातील पनवेल, उरण, अलिबाग, पेण, कर्जत, मुरुडसह सर्वच तालुक्यातील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

मुरुड: शहरासह तालुक्यामधील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत राम नवमी तथा प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी एकदरा गावात श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्यात आला.
पहाटे श्रीराम मंदिरात अभ्यंगस्नान आणि काकड आरतीचा मान मेघराज पाटील आणि त्यांच्या पत्नी दुरेशा पाटील तसेच जगदीश गंबास तसेच त्यांच्या पत्नी मालती गंबास यांना मिळाला. माणगाव येथील ह.भ.प.परशुराम उपाध्ये यांनी किर्तनात श्रीराम जन्मोत्सव गाऊन सर्वांना मोहीत केले. त्यांना साथ देण्याकरिता मृदूक महेश सुर्वे, सुनिल विरुकुडची साथ लाभली.
सरपंच रामकृष्ण आगरकर, चंद्रकांत पाटील, मेघराज पाटील आणि हरिश्चंद्र आगरकर यांच्या हस्ते श्रीरामाची चांदीची मुर्तीचा दूधाने अभिषेक करुन पुरोहिताकडून पुजा करण्यात आली. त्यानंतर श्रीरामला पाळण्यात घालुन अंगाई गीत गाण्यात आले. श्रीरामासमोर नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविकांसह राजकीय मंडळींनीही गर्दी केली होती. उत्सवानिमित्त मंदिर परिसरात विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी चिंतामणी लोदी, पांडुरंग आगरकर, ललित मडवी, जगन्नाथ वाघरे महादेव कोळी समाज आणि ट्रस्ट एकदरा, धनुर्धारी महिला मंडळ एकदरा, धनुर्धारी रहिवासी मंडळ, मुंबई मंडळाच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यासाठी मेहनत घेतली.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुमित खोत, सहाय्यक फौजदार दिपक राऊळ, पोलिस नाईक सुरेश वाघमारे, लव गोंधळी, आरती पवार, पोलिस शिपाई विक्रांत बांधणकर, प्रशांत लोहार, सागर रसाळ, रितेश यादव, पोलिस हवालदार सागर रोहेकर, ट्रॉफीक पोलिस नाईक, किशोर बठारे तसेच गायकवाड आदिंनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान जिल्ह्यातील पनवेल, उरण, अलिबाग, पेण, कर्जत, मुरुडसह सर्वच तालुक्यातील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -