घररायगडखालापूरमधील हंचलीकर कुटुंबाचे तहसीलदारांकडून सांत्वन

खालापूरमधील हंचलीकर कुटुंबाचे तहसीलदारांकडून सांत्वन

Subscribe

दुर्दैवी हंचलीकर कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुरजनक परिस्थितीमुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दरम्यान, खालापूरमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात ओढ्याकाठी खेळण्यासाठी गेलेले सख्खे बहिण-भाऊ बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी ७ वर्षीय निलंभ्भाचा मृतदेह ८ किलोमीटर अंतरावर महडनजिक मंगळवारी सकाळी सापडला. अपघातग्रस्त मदत पथक आणि सहज सेवा आपत्कालीन पथक 3 वर्षीय बाबू याचा मृतदेह शोधण्यासाठी अथक मेहनत घेत होते. तालुक्यामधील खोपोली क्रांती नगरमधील निलंभ्भा श्रीकांत हंचलीकर आणि बाबू पाताळगंगा नदी पात्रात वाहून गेले होते. स्थानिक प्रशासनाने शोध मोहिमेचे काम अपघातग्रस्त मदत पथक आणि सहज सेवा आपत्कालीन पथक, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने तात्काळ सुरू केले होते. तहसीलदार ईरेश चप्पलवार यांनी शोध मोहिम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत शोध मोहिमेचा आढावा घेतला. त्यानंतर दुर्दैवी हंचलीकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत मदतीचे आश्वासन दिले आहे.

पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टर

रायगड, चिपळूण, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकले आहेत. महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न, वीजवाहिन्या भूमिगत करणार; विजय वडेट्टीवारांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -