घररायगडउल्हास - पेज नदीतून दिवसाढवळ्या पाणीचोरी; वन विभाग, पाटबंधारे व महावितरणची मूकसमंती?

उल्हास – पेज नदीतून दिवसाढवळ्या पाणीचोरी; वन विभाग, पाटबंधारे व महावितरणची मूकसमंती?

Subscribe

फार्म हाऊस मालक ललीतकुमार एस. कनोडीया व इतर फार्म हाऊस मालक उल्हास - पेज नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करीत आहेत. याबाबत वन विभाग व पाटबंधारे विभागाला माहिती देण्यात आली.

उल्हास – पेज नदीत विना परवानगी मोटार टाकून वन विभागाच्या जागेतून पाईपलाईन टाकून फार्म मालक दिवसाढवळ्या पाणी चोरत आहेत. मात्र,वन विभाग, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यातील गणेगाव चिंचवली गावाच्या हद्दीतील सर्व्हे नंबर ३७ ही वनविभागाची जागा आहे. फार्म हाऊस मालक ललीतकुमार एस. कनोडीया व इतर फार्म हाऊस मालक उल्हास – पेज नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करीत आहेत. याबाबत वन विभाग व पाटबंधारे विभागाला माहिती देण्यात आली. पण दोन्ही विभागाकडून वेळकाढू भूमिका घेण्यात येत असल्याने पाणी नेमके कुठे मुरतेय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

फार्म हाऊस मालकाने उपसा सिंचनास परवानगी मिळण्यासाठी उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे ९ एप्रिल २०२१ रोजी लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. याबाबत उपविभागीय अभियंता पाटबंधारे कर्जत यांनी सदर पत्राला २७ एप्रिल २०२१ ला लेखी स्वरुपात उत्तर देताना सांगितले की, आपण उल्हास – पेज नदीमधून आपली पाईपलाईन नदीपासून फॉर्म हाऊसपर्यंत कशी टाकणार, त्याबाबत नकाशावर रंगवून या कार्यालयास सादर करावे.

तसेच ज्या जागेमधून पाईपलाईन जाणार आहे, त्या भूधारकांचा नाहरकत दाखला सोबत जोडण्यात यावा, जेणेकरून आपणास सिंचनाची परवानगी देणे शक्य होईल. परंतु फॉर्म हाऊस मालकाने अजूनही याबाबत कागदपत्रे सादर केली नसल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -