घरAssembly Battle 2022Uttar Pradesh-19 वर्षांनंतरही या मर्डर मिस्ट्री भोवतीच फिरते यूपी विधानसभा निवडणुकीचे राजकारण

Uttar Pradesh-19 वर्षांनंतरही या मर्डर मिस्ट्री भोवतीच फिरते यूपी विधानसभा निवडणुकीचे राजकारण

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये पहील्या टप्प्यातील मतदान झाले असून सर्वत्र राजकीय वातावरणही तापले आहे. याचदरम्यान, लखनऊ येथील मॉल अॅव्येन्यू रोडवर कवियित्री मधुमिता शुक्ला यांची बहीण निधी शुक्ला आणि सारा सिंह यांची आई सीमा सिंह या बसपा कार्यालयाबाहेर अचानक आंदोलनाला बसल्या. यामुळे राजकीय वर्तृळात खळबळ उडाली. बहुजन समाज पार्टीने महाराजगंजच्या नौतनवा जागेसाठी अमनमणि त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. यास अमनमणि यांची सासू सीमा सिंह आणि निधी यांचा विरोध आहे. यावरूनच सीमा सिंह यांनी बसपाच्या सुप्रीमो मायावती यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे मायावती कायद्याची भाषा करतात आणि दुसरीकडे मात्र कायदा हातात घेणाऱ्यांना उमेदवारी देतात. असा घणाघात करत सिंह यांनी मायावती दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सीमा सिंह या नक्की कोणत्या विषयाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून आता यूपीमध्ये चर्चा रंगल्या आहेत. तर सीमा सिंह यांनी अमनमणि त्रिपाठींना ज्या घटनेवरून लक्ष्य केले आहे त्या घटनेचा संबंध १९ वर्षांपूर्वी घडलेल्या एका मर्डरमिस्ट्रीबरोबर आहे. ज्याचे सावट आजही उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांवर आहे.

नेमके काय आहे हि मर्डर मिस्ट्री?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेहमीच बाहुबली नेत्यांचा दबदबा राहीला आहे. निवडणूका जवळ आल्या की भल्या भल्यांना जमणारं नाही अशी रस्साळ आश्वासन जनतेला देत विजय खेचून आणण्यात हे नेते माहिर आहेत. पूर्वांचलमध्येही असेच एक मुत्सद्दी नेते होते. अमरमणि त्रिपाठी. पूर्वांचलमध्ये डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिशंकर तिवारीचे राजकीय वारस असलेल्या अमरमणिचा करिश्मा काही वेगळाच होता. यामुळे सरकार भाजपचे असो किंवा सपा- बसपाचे प्रत्येक कॅबिनेटमध्ये त्यांचा सहभाग असायचा.

- Advertisement -

सलग ६ वेळा आमदार असलेले अमरमणि त्रिपाठींचा समावेश अशा निवडक नेत्यांमध्ये व्हायचा जे तुरुंगात असतानाही निवडून आले होते. आजही अमरमणि तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. अमरमणि यांचा गुन्हेगारी जगताशी सरळसरळ संबंध होता. पण १९ वर्षांपूर्वी अशी काही घटना घडली की बाहुबली अमरमणि यांचे राजकीय करियरच संपले. ९ मे २००३ साली लखनौच्या पेपरमिल कॉलोनीत मधुमिता शुक्ला नावाच्या एका २४ वर्षीय कवियित्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये ती गरोदर असल्याचे समोर आले.

डिएनए तपासणीत मधुमिताच्या गर्भातील मूल हे अमरमणिचे असल्याचे समोर आले. याघटनेवरून युपीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मधुमिताचा खून अमरमणिनेच केल्याचा आरोप होता. यासाठी त्याच्या पत्नीने मधुमणिने त्याला मदत केल्याचे समोर आले. त्यानंतर सहा महिन्याच्या आत फास्टट्रॅक कोर्टाने अमरमणि , मधुमणिसह चारजणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

मधुमिता शुक्ला ही नावाजलेली कवियित्री होती. लखीमपुर खीरी येथे राहणाऱ्या मधुमिता कवितेतून राजकारणावर परखड मत मांडायची. निडर, धाडसी मधुमिता हिंदी कवि संमेलनाच्या आर्कर्षणाचा केंद्रबिंदू होती. तिचे नाव राजकीय जगतातही गाजत होते. त्यातूनच तिने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

याचदरम्यान, तिची अमरमणि यांच्याबरोबर जवळीक वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरमणि विवाहीत होते. सगळे आलबेल सुरू असतानाच मधुमिताचा खून झाला. विरोधकांनी प्रकरण लावून धरले. अमरमणि यांनी राजकीय दबावाचा वापर करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. नंतर पुराव्यांच्या आधारावर अमरमणि , त्यांची पत्नी मधुमणि, भाचा रोहीत याच्यासह दोन शूटर यांना दोषी ठरवण्यात आले. सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

अमरमणि याच्यावर फक्त मधुमिताच्या हत्येचाच गुन्हा नाही तर किडनेपिंग आणि इतर गुन्हेही आहेत. यामुळे युपीमध्ये जेव्हा निवडणुकांचे बिगुल वाजते तेव्हा विरोधक अमरमणि यांच्या प्रतापाचे पाढे हमखास वाचतात.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -