घररायगडबीडखुर्दमधील महिलांची पाण्यासाठी वणवण; स्मशानभूमी बनली कपडे धुण्याची जागा

बीडखुर्दमधील महिलांची पाण्यासाठी वणवण; स्मशानभूमी बनली कपडे धुण्याची जागा

Subscribe

खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील बीडखुर्द गावातील ग्रामस्थांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महिला आणि ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. तर पाण्याची टंचाई अशा परिस्थितीने बीडखुर्द गावातील नागरिक हवालदिल झाले असून पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार ? अशी विचारणा महिलांकडून होत आहे. बीडखुर्द ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करीत असताना येथील महिलांना कपडे धुण्यासाठी चक्क स्मशानभूमीवर जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

खोपोली: खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील बीडखुर्द गावातील ग्रामस्थांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महिला आणि ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. तर पाण्याची टंचाई अशा परिस्थितीने बीडखुर्द गावातील नागरिक हवालदिल झाले असून पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार ? अशी विचारणा महिलांकडून होत आहे. बीडखुर्द ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करीत असताना येथील महिलांना कपडे धुण्यासाठी चक्क स्मशानभूमीवर जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे आमच्या वाट्याला पाण्यासाठीची वणवण पाचवीलाच पुजल्याचे मत महिलांकडून व्यक्त होत आहे.
बीडखुर्द ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत असून शेकडो जनावरांना देखील पाणी टंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच बीडखुर्द गावात पाणी टंचाई भेडसावू लागलीय. घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे. गावात भीषण पाणी टंचाईच संकट आ वासून उभं ठाकलंय असल्याने सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून पुढील महिना कसा काढायचे असा प्रश्न लोकांना पडल्याने महिला वर्गात नाराजी उमटू लागली असताना बीडखुर्द गावातील महिला, ग्रामस्थांनी पाण्यासाठी वणवणींच्या व्यथा अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे मांडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ आणि महिला वर्ग लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

संतापाची भावना 
या भागातील लोकप्रतिनिधी पाणी प्रश्न सोडविण्याच्या घोषणा निवडणुकीच्या दरम्यान करीत असून निवडणूक संपल्या नंतर मात्र त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे, त्यामुळे महिला वर्गात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असतांना बीडखुर्द गावात पाणी टंचाई जाणविण्यास सुरूवात झाली आहे. टंचाई दूर करण्यासाठी सरकारी योजना जाहीर करण्यात आली असली तरी याठिकाणची योजना अर्धवट राहीली असल्याने सरकारची फसवणूक आणि नागरिकांची निराशा होते.
– लवेश कर्णुक
ग्रामस्थ, बीडखुर्द

बीडखुर्द गावातील महिलांच्या वाट्याला पाणी टंचाई पाचवीलाच पुजलेली असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून येथील महिलांना एक हंडा पाणी भरण्यासाठी तासनंतास हातपंपावर उभे राहावे लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी सूर उमटत आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना राबवून येथील महिलांचा पाणी प्रश्न सोडवावा, जेणेकरून महिल्यांचा मानसिक त्रास होणार नाही.
रामदास फावडे,
खालापुर तालुका युवा उपाध्यक्ष, पोलिस मीत्र संघटना नवी दिल्ली भारत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -