घरश्रावण स्पेशलश्रावण विशेष : श्रावण मासारंभ, जाणून घ्या महत्त्व

श्रावण विशेष : श्रावण मासारंभ, जाणून घ्या महत्त्व

Subscribe

आजपासून श्रावण महिन्यास सुरूवात होत आहे. हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतील श्रावण महिना हा २३ जुलै ते २२ ऑगस्ट या तारखेदरम्यान येतो.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे…,

- Advertisement -

श्रावण मास सुरू झाला की बालकवींच्या कवितेतील या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावणाला हिंदीत सावन तर संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) म्हणतात. श्रावणामध्ये पावसाच्या सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.

श्रावणातील पाऊस
श्रावणातील पाऊस

श्रावण हा सणांचा महिना. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

श्रावणातील व्रतवैकल्ये

श्रावणातील व्रतवैकल्ये –

  • सोमवार – श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची परंपरा आहे.
  • मंगळवार – नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव-मंगळागौरीची पूजा करतात.
  • बुधवार- बुधाची पूजा केली जाते.
  • गुरुवार- बृहस्पती पूजा केली जाते.
  • शुक्रवार – जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.
  • शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन केले जाते.
  • रविवार- आदित्य राणूबाई पूजन केले जाते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -