घरक्रीडा१०२ वर्षाच्या भारतीय आजीबाईचा नवा विक्रम 

१०२ वर्षाच्या भारतीय आजीबाईचा नवा विक्रम 

Subscribe

धावण्याच्या स्पर्धेत जिंकले सुवर्ण

नवी दिल्ली : वय वाढले कि माणूस काही करू शकत नाही असे मानणारा एक वर्ग आहे. पण हि बाब १०२ वर्षाच्या मन कौर यांनी खोटी ठरवली आहे.वय नाही तर इच्छा असेल तर आपण कोणत्याही वयात हे त्यांनी दाखवून दिले आहेत.

वर्ल्ड मास्टर्स या जागतिक स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत १०२ वर्षांच्या भारतीय आजीबाई मन कौर यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. १०० ते १०४ या वयोगटात त्यांनी २०० मीटर धावण्याच्या माझे शरीर अजूनही थकलेले नाही हे दाखवत त्यांनी सुवर्णकमाई केली आहे. स्पेनमध्ये या स्पर्धा पार पडल्या.

- Advertisement -

या ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध क्रीडाप्रकार खेळवण्यात आले. त्यात २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १०० ते १०४ या वयोगटात भारताच्या १०२ वर्षाच्या आजीबाईंनी सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उंचावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -