घरक्रीडाIPL 2021 Auction : श्रीसंतचे पुनरागमन; 'या' खेळाडूंनी मात्र नाव नोंदवणे टाळले 

IPL 2021 Auction : श्रीसंतचे पुनरागमन; ‘या’ खेळाडूंनी मात्र नाव नोंदवणे टाळले 

Subscribe

लिलावासाठी भारताच्या ८७४ आणि २८३ परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पुढील मोसमाआधी होणाऱ्या खेळाडू लिलावाबाबत (Auction) सध्या बरीच चर्चा होत आहे. यंदाचा आयपीएल खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे. या लिलावासाठी १०९७ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली असून यात भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतचाही समावेश होता. इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या स्टार खेळाडूंनी मात्र आपली नावे नोंदवणे टाळले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही खेळाडू लिलावात सहभागी होणार असून त्याची मूळ किंमत २० लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या लिलावासाठी भारताच्या ८७४ आणि २८३ परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यापैकी सर्वाधिक खेळाडू हे वेस्ट इंडिजचे (५६) आहेत.

श्रीसंत आयपीएल खेळण्यास उत्सुक

सात वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंतने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पुनरागमन केले. केरळकडून खेळताना त्याने पाच सामन्यांत चार विकेट घेतल्या. आता ३७ वर्षीय श्रीसंत आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असून त्याने आपली मूळ किंमत ७५ लाख रुपये इतकी ठेवण्याची माहिती आहे. २०१३ आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये ही बंदी कमी करून सात वर्षे करण्यात आली होती.

- Advertisement -

हरभजनची मूळ किंमत २ कोटी

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल खेळाडू लिलावासाठी हरभजन सिंग, केदार जाधव, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंनी आपली मूळ किंमत २ कोटी रुपये इतकी ठेवली आहे. तसेच भारताचे कसोटीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा (५० लाख) आणि हनुमा विहारी (१ कोटी) यांनीही लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. मागील वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जेम्स पॅटिन्सनने मात्र आपले नाव नोंदवलेले नाही.


हेही वाचा – दिल्ली कॅपिटल्स ‘या’ तीन खेळाडूंना संघात घेण्याची शक्यता 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -