घरक्रीडाफिंच ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार

फिंच ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार

Subscribe

आक्रमक सलामीवीर अॅरन फिंच याची ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार म्हणून निवड झाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने २ उपकर्णधार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

आक्रमक सलामीवीर अॅरन फिंच याची ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार म्हणून निवड झाली आहे. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथवर बॉल टॅम्परिंगमुळे बंदी घालण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाने फिंचला टी-२० संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची निवड झाली.

- Advertisement -

पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

२४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची निवड झाली. या संघात दुखापतीतून सावरलेल्या क्रिस लिन आणि नेथन कुल्टर-नाईल यांचीही निवड झाली आहे. क्रिस लिन काही महिन्यांपूर्वी खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता. पण त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळाला होता. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन केले. त्यामुळे त्याची संघात निवड झाली आहे. तर कुल्टर-नाईलनेही या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्याने त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच बेन मॅकडरमॉट या नवीन खेळाडूचीही निवड झाली आहे. मॅकडरमॉट हा आक्रमक फलंदाज आहे. त्याने बिग बॅश लीग आणि स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात संधी मिळाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -