घरक्रीडाकसोटीच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तानची दमछाक

कसोटीच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तानची दमछाक

Subscribe

शिखर धवन हा पहिला भारतीय बॅट्समन ठरला आहे ज्याने टेस्ट मॅचमध्ये लंच ब्रेकपूर्वी शतक पूर्ण केले आहे. हा रेकॉर्ड करणारा शिखर जगातील सहावा बॅट्समन ठरला आहे. ८७ बॉल्समध्ये त्याने चौकारासह त्याने आपले शतक पूर्ण केले आहे. ९६ बॉल्समध्ये १०७ रन करत २९व्या अहमदझाईच्या ओव्हरला शिखर कॅचआऊट झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ गेल्या काही वर्षात धडपड करत होता. आयसीसीकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ भारतासोबत पहिलावहिला सामना खेळत आहे. बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने आपल्या धमाकेदार बॅटिंगने अफगाणिस्तानच्या बॉलर्सना अक्षरशः धुवून काढले. दिवसाखेरीस भारताच्या ३४७ धावा झाल्या असून ६ विकेट गेल्या. भारतीय फलदांजाना रोखताना अफगाणिस्तानच्या संघाची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसले.

भारताने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि मुरली विजय यांनी सलामीसाठी बॅटिंग करताना उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी १६८ रनांची भागीदारी रचली. आधी शिखरने आणि त्यानंतर मुरली विजयच्या शतकाने भारताचा धावफलक मजबूत केला. मात्र अहमदझाईच्या २९व्या ओव्हरला नाबीने घेतलेल्या शिखरच्या कॅचने भारताला पहिला झटका बसला. नंतर के एल राहुल आणि मुरली विजय यांच्या भागीदारीने भारताच्या २०० धावांचा टप्पा पूर्ण केला. यानंतर १४३ बॉल्समध्ये मुरली विजयने शतक झळकावले. के एल राहुलनेही ६४ बॉल्स मध्ये ५४ रन करत अर्धशतक झळकावले. यानंतर मात्र मधल्या फळीतील बॅट्समन काही खास करु शकले नाहीत. कप्तान अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विकेट किपर दिनेश कार्तिक यांच्या विकेट्स एकापाठोपाठ गेल्या. यानंतर पांड्या आणि अश्विन यांनी नाबाद रहात भारताच्या ३४७ धावा पूर्ण केल्या. ७८ ओव्हरच्या आजच्या खेळात भारताने ३४७ रन केले आहेत.अफगाणिस्तानकडून अहमदझाईने उत्कृष्ट बॉलिंग केली असून त्याने तब्बल ६ मेडन ओव्हर टाकल्या. १३ ओव्हर्समध्ये २.४६ च्या इकॉनॉमिने त्याने केवळ ३२ रन दिल्या.

- Advertisement -

शिखरने केला हा रेकॉर्ड

शिखर धवन हा पहिला भारतीय बॅट्समन ठरला आहे ज्याने टेस्ट मॅचमध्ये लंच ब्रेकपूर्वी शतक पूर्ण केले आहे. हा रेकॉर्ड करणारा शिखर जगातील सहावा बॅट्समन ठरला आहे. ८७ बॉल्समध्ये त्याने चौकारासह त्याने आपले शतक पूर्ण केले आहे. ९६ बॉल्समध्ये १०७ रन करत २९व्या अहमदझाईच्या ओव्हरला शिखर कॅचआऊट झाला.

shikhar d
शिखर धवन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -