घरक्रीडाIND vs PAK : खेळाडूंची सुरक्षा आवश्यक, गृह मंत्रालय निर्णय घेईल, अनुराग...

IND vs PAK : खेळाडूंची सुरक्षा आवश्यक, गृह मंत्रालय निर्णय घेईल, अनुराग ठाकूरांचे स्पष्टीकरण

Subscribe

भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यावरून सध्या क्रिकेटविश्वात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याचे समजताच बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर पीसीबीनेही 2023ला भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवणार नसल्याचे सांगितले.

भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यावरून सध्या क्रिकेटविश्वात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याचे समजताच बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर पीसीबीनेही 2023ला भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकंदरीत आता भारत आणि पाकिस्तानात क्रिकेटयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (anurag thakur say home ministry will decide if indian cricket team will travel to pakistan for asia cup)

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याबाबत स्पष्टीकरण दिले. “याबाबतचा निर्णय गृह मंत्रालय घेईल. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. भारत कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाही. क्रीडा मंत्री म्हणाले की, एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि पाकिस्तानसह सहभागी देशांना हार्दिक आमंत्रित केले जाईल आणि स्पर्धा वेळापत्रकानुसार चालेल. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची चिंता असल्याने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय गृह मंत्रालय घेईल”, असे ठाकूर यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “हा बीसीसीआयचा विषय आहे आणि ते त्यावर भाष्य करतील. भारत ही क्रीडा महासत्ता आहे, जिथे अनेक विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असून जगभरातील सर्व मोठे संघ त्यात सहभागी होणार आहेत. आपण कोणत्याही खेळात भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताने खेळांमध्ये, विशेषतः क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले आहे, त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक आयोजित केला जाईल आणि तो एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम असेल”, असेही त्यांनी म्हटले.

पुढील वर्षी आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. परंतु, बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. 2008 आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानने केले होते. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडत गेले आणि भारताने कधीही पाकिस्तानला भेट दिली नाही. पाकिस्तानने शेवटची वेळ 2013 मध्ये भारताला भेट दिली होती. यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध आणखी बिघडले आणि ही दोन्ही देशांमधील शेवटची मालिका ठरली.

भारतीय संघ सध्या T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. तेथे त्याला 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानचा बदला घेणार आहे. गेल्या वेळी T20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी संघ मेलबर्नला उतरणार आहे.


हेही वाचा – Google Pay कडून वापरकर्त्यांना दिवाळी गिफ्ट; करावं लागेल ‘हे’ काम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -