घरक्रीडाAsian Boxing Championship : अमित पांघल, शिवा थापाची सुवर्णपदकाची संधी हुकली 

Asian Boxing Championship : अमित पांघल, शिवा थापाची सुवर्णपदकाची संधी हुकली 

Subscribe

पांघल आणि झोइरोव्ह यांच्यातील अंतिम लढतीमधील दुसऱ्या फेरीचा भारताने रिव्हिव्यू मागितला आहे.

भारताचे आघाडीचे बॉक्सर्स अमित पांघल (५२ किलो) आणि शिवा थापा (६४ किलो) यांची आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद (Asian Boxing Championship) स्पर्धेत सुवर्णपदकाची संधी हुकली. या दोघांनाही अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गतविजेत्या पांघलला यंदाही सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने सुरुवातीच्या लढतींमध्ये अप्रतिम खेळ करत अंतिम फेरी गाठली. परंतु, या फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झोइरोव्हने २-३ असे पराभूत केले. याआधी २०१९ जागतिक स्पर्धेतही झोइरोव्हनेच पांघलचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.

दुसऱ्या फेरीचा रिव्हिव्यू

पांघल आणि झोइरोव्ह यांच्यातील अंतिम लढतीमधील दुसऱ्या फेरीचा भारताने रिव्हिव्यू मागितला आहे. याचा निकाल काही काळाने सांगितला जाईल. पांघलने या स्पर्धेत मिळालेले रौप्यपदक प्रशिक्षक अनिल धनकर यांना समर्पित केले. ते दुबईला जाऊ शकले नाहीत. परंतु, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले, तर त्यावेळी तुम्ही सोबत असावे ही इच्छा असल्याचे पांघल ट्विटरवर म्हणाला.

- Advertisement -

शिवाला सलग पाचवे पदक

दुसरीकडे शिवा थापालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ६४ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याला मंगोलियाच्या बातरसुख चिंझोरिगने २-३ असे पराभूत केले. परंतु, शिवाला या स्पर्धेत सलग पाचवे पदक मिळवण्यात यश आले. या स्पर्धेतील शिवाचे हे दुसरे रौप्यपदक ठरले. शिवा आणि पांघल या दोघांनीही अंतिम लढतींमध्ये चांगला खेळ केला. परंतु, पंचांनी त्यांना अपेक्षित गुण दिले नाहीत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -