Asian Games 2018 : इराणच्या त्या खेळाडूने केवळ पदक नव्हे तर मनही जिंकले

आशियाई स्पर्धेत वुशु (सांडा) सामन्यात जखमी झालेल्या भारतीय खेळाडूला इराणच्या या खेळाडूने अलगद उचलून घेतले व मैदानाबाहेर नेले. इराणच्या या खेळाडूने सामन्यासह लोकांची मनंदेखील जिंकली.

surya bhanu pratap singh
सूर्य भानू प्रताप सिंग

जकार्ता येथे सध्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहेत भारतीय खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत अंत्यत चुरशीचे, अटीतटीचे सामने पहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडू प्रतीस्पर्धी खेळाडूवर तुटून पडताना दिसतोय. परंतु अशा वेळी सर्वांना एका वेगळ्या घटनेचे साक्षीदार होता आले. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वुशुचे सामने होते. भारतीयांनी यामध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आज झालेल्या एका सामन्यात भारतीय खेळाडू जखमी झाला. सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने भारतीय खेळाडुला उचलून भारतीय संघ ज्या ठिकाणी बसला होता तेथे सोडून आला. त्यामुळे या खेळाडूने केवळ पदकच नव्हे तर लोकांची मनंही जिंकली.

नेमके काय झाले?

भारताचा वुशु खेळाडू सूर्य भानू प्रताप सिंगने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. त्याने त्याचा सेमीफायनलमधला सामना गमावला. सांडा (वुशु) स्पर्धेत ६० किलो वजनी गटात सूर्यचा सामना इराणचा खेळाडू इरफान अहानगारियानशी होता. या सामन्यात सूर्य हरला. इरफानच्या पंच आणि किक्सने सूर्य जखमी झाला होता. सामना संपल्यानंतर सूर्य चालूदेखील शकत नव्हता. त्यामुळे सामना संपल्यानंतर इरफानने सूर्यला स्वत: उचलून घेतले. त्याने सूर्यला रींगणाबाहेर भारतीय खेळाडुंकडे सोपवले.

पहा व्हिडिओ