घरक्रीडाचौथ्या क्रमांकावर अखेर राहुल पास

चौथ्या क्रमांकावर अखेर राहुल पास

Subscribe

धोनीचेही शतक

लंडन, येथे झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात भारताने 359 धावांचा डोंगर उभारला. यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने दुसर्‍या सराव सामन्यात तिनशे धावांचा आकडा पार केला. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा तिढा काही सुटत नव्हता.परंतु,अनेक उपाय करूनही चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून साजेशी कामगिरी होत नव्हती.

परंतु,अखेर चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या लोकेश राहुलने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली. बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात झाली नसली तरी राहुल आणि धोनी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली आहे. धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत.

- Advertisement -

विराट कोहलीने 47 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. पण राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -