घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ घाबरून खेळला; माजी क्रिकेटपटूची टीका

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ घाबरून खेळला; माजी क्रिकेटपटूची टीका

Subscribe

भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ जिंकण्यासाठी नाही, तर पराभूत न होण्यासाठी खेळत होता. त्यांना पराभवाची भीती होती, अशा शब्दांत माजी कर्णधार मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियन संघावर टीका केली. ऑस्ट्रेलियन संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश देईल, असे हा दौरा सुरु होण्यापूर्वी क्लार्क म्हणाला होता. मात्र, त्याचे हे भाकीत भारतीय संघाने खोटे ठरवले. भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाला केवळ कर्णधार टीम पेनला जबाबदार धरणे चुकीचे ठरेल, असे क्लार्कला वाटते.

आक्रमकता दाखवली पाहिजे होती

या संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने नकारात्मक खेळ केला. त्यांनी आक्रमक शैलीत खेळण्याचा आणि सामने जिंकण्याचा विचार केला नाही. त्यांना पराभवाची भीती होती. ऑस्ट्रेलियाने अखेरचा कसोटी सामना २० षटके शिल्लक असताना गमावला की अखेरच्या चेंडूवर गमावला याने काहीही फरक पडत नाही. बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चौथा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यांनी याचा दबाव न घेता आक्रमकता दाखवली पाहिजे होती. त्यांनी जिंकण्याच्या उद्देशाने खेळ केला पाहिजे होता, असे क्लार्क म्हणाला.

- Advertisement -

कर्णधाराला जबाबदार धरणे चुकीचे

या पराभवासाठी केवळ कर्णधार टीम पेनला जबाबदार धरता येणार नाही. आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराला पूर्वीइतके अधिकार नाहीत. प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष यांनाही आता बरेच निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे अपयश केवळ टीम पेनचे नव्हते, असेही क्लार्कने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -