घरक्रीडाबाबर आझमची उत्कृष्ट कामगिरी, धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

बाबर आझमची उत्कृष्ट कामगिरी, धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

Subscribe

आयपीएल 2023 च्या 16व्या हंगामाला सुरूवात झाली असून क्रिकेटप्रेमींमध्ये वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना हा काल(शुक्रवार) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान पाकिस्तानने न्यूझीलंडवर 88 धावांनी मात करत विजयी सलामी दिली.

दरम्यान, पाकिस्तानने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. परंतु यावेळी या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने उत्कृष्ट कामगिरी करत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

- Advertisement -

बाबरचा न्यूझीलंड विरुद्धचा हा कर्णधार म्हणून 42वा विजय ठरला. यासह बाबरने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. बाबरला आता यानंतर 2 विजयांसह कर्णधार म्हणून सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याचा आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक टी20 विजय –

- Advertisement -

असगर अफगाण – 52 पैकी 42 विजय.

इयॉन मॉर्गन – 72 पैकी 42 विजय.

बाबर आझम – 67 पैकी 41 विजय.

महेंद्रसिंह धोनी – 72 पैकी 41 विजय.

एरॉन फिंच – 76 पैकी 40 विजय.

दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सैम अयुब आणि फखर जमान या दोघांच्या प्रत्येकी 47 धावांच्या जोरावर न्यूझीलंडला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु न्यूझीलंडला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानने न्यूझीलंडला 15 ओव्हरमधून 94 धावांवर ऑलआऊट केलं.


हेही वाचा : जय शाह यांचा पाकिस्तानला जोर का झटका, आशिया चषकवर केलं मोठं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -