घरक्रीडाभारताच्या लक्ष्यने पटकावले सुवर्णपदक

भारताच्या लक्ष्यने पटकावले सुवर्णपदक

Subscribe

ज्युनियर आशिया चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनवर विजय मिळवत पटकावले सुवर्णपदक

भारताचा १६ वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने याने ज्युनियर आशिया चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम कामगिरी सुवर्णपदक पटकावले आहे. लक्ष्य याने अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनला २१-१९ आणि २१-१८ च्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.


सामना सुरूवातीपासूनच अटीतटीचा सुरू होता. पहिल्या सत्रात कुनलावुत जिंकेल असे वाटत असतानाच लक्ष्यने आपला खेळ उंचावत २१-१९ ने पहिले सत्र जिंकले. तर दुसऱ्या सत्रातही लक्ष्यने अप्रतिम खेळ दाखवत २१-१८ च्या फरकाने विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले.

- Advertisement -
Lakshya Sen
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन

स्पर्धेत भारताच्या लक्ष्यने सुवर्णपदक पटकावले आहे. तर थायलंडच्या कुनलावुतने रौप्यपदक पटकावले असून इंडोनेशीयाच्या इख्सान लियोनार्डोने कांस्यपदक पटकावले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे भारताने याच स्पर्धेत याआधी तीनवेळेस सुवर्णपदक जिंकले आहे. सर्वात आधी म्हणजे १९६५ ला अंदाजे ५३ वर्षांपूर्वी भारताच्या गौतम ठक्कर यांनी सुवर्णपदक पटकावले होते त्यानंतर थेट २०१२ ला भारताची सुपर्णकन्या पी. व्ही. सिंधूनेही भारताला सुवर्णपदक मिळवून दिला होता.

pv sindhu
पी. व्ही. सिंधू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -