घरक्रीडाबीसीसीआयची निवडणूक २३ ऑक्टोबरला

बीसीसीआयची निवडणूक २३ ऑक्टोबरला

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सार्वत्रिक निवडणुका २२ ऑक्टोबरऐवजी आता २३ ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपली निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती मंगळवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बीसीसीआयने आपल्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकांमुळे सदस्यांची अडचण होऊ नये यासाठी बीसीसीआयने आपल्या निवडणुका २२ ऐवजी २३ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

प्रशासकीय समितीच्या दुसर्‍या सदस्य डायना एडल्जी यांनी बीसीसीआयच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला, पण विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयच्या निवडणुका एक दिवस पुढे ढकलायला हरकत नाही, असे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -