घरक्रीडाबीएसएनएलची फुटबॉल वर्ल्डकप ऑफर

बीएसएनएलची फुटबॉल वर्ल्डकप ऑफर

Subscribe

१४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा

रिलायन्सच्या स्पर्धेत आता बीएसएनएलही उतरले आहे. त्यांनी ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा देऊ केला आहे. या ऑफरचे नाव आहे फीफा वर्ल्ड कप स्पेशल डेटा एसटीव्ही १४९. मात्र या ऑफरमध्ये एकच अडचण आहे. हा प्लान फक्त १४ जून ते १५ जुलै या दरम्यान, म्हणजे फुटबॉल वर्ल्डकप सुरू असेपर्यंतच असणार आहे.

टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. त्याचा फायदा अर्थातच ग्राहकांना होत आहे. त्यांना जास्तीतजास्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या रोज नवीन ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर बीएसएनएल कंपनीने दिली आहे.

- Advertisement -

बीएसएनएलचा १४६ रुपयांचा हा प्लॅन बुधवारपासून लागू करण्यात आला आहे. बीएसएनएलची सेवा देशभरात आहे, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. एअरटेलनेही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ वापरकर्त्याला पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यानं दिवसाला 3 जीबी डेटा संपवल्यास त्याचे नेट सुरूच राहणार असून, स्पीड कमी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -