घरक्रीडाIPL : चेन्नई देणार सुरेश रैनाला डच्चू? 

IPL : चेन्नई देणार सुरेश रैनाला डच्चू? 

Subscribe

रैनाने यंदा आयपीएल स्पर्धेत अचानक न खेळण्याचा निर्णय घेतला हे चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आवडलेले नाही. 

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणामुळे यंदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. रैना हा चेन्नईचा प्रमुख फलंदाज असून त्याने आयपीएल स्पर्धेत या संघाकडून सर्वाधिक धावा (४५२७) केल्या आहेत. त्यामुळे तो यंदाच्या स्पर्धेत न खेळणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का आहे. मात्र, आता स्पर्धा सुरु होण्याआधी अचानक माघार घेणे रैनाला महागात पडू शकेल. याचे कारण म्हणजे चेन्नई संघ पुढील मोसमाआधी रैनाला डच्चू देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.

रैनाची वागणूक श्रीनिवासनना आवडलेली नाही 

यंदा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई संघाचे दुबईतशिबीर सुरु आहे. तिथेच चेन्नई संघातील १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले, ज्यात दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचाही समावेश होता. रैनाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून अचानक माघार घेण्यामागे हेच कारण होते असेही म्हटले जात आहे. मात्र, ही गोष्ट चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला फारशी आवडलेली नाही. खासकरून, क्वारंटाईनमध्ये असताना रैनाची वागणूक चेन्नईचे संघमालक एन श्रीनिवासन यांना अजिबातच आवडलेली नाही.

- Advertisement -

रैना मिळालेल्या खोलीवरून नाराज 

‘चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापक यांना हॉटेलमध्ये वेगळी, प्रशस्त खोली दिली जाते. त्यांच्यासोबतच रैनालाही प्रत्येक वेळी मोठी खोली मिळते. यावेळी फक्त रैनाच्या खोलीला बाल्कनी नव्हती. हे त्याला फारसे आवडले नाही. मात्र, स्पर्धेतून माघार घेऊन भारतात परतण्यास इतकेसे कारण पुरेसे नाही,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘रैना या मोसमात खेळणार नाही हे चेन्नईने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, रैनाची वागणूक चेन्नई संघाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या लोकांना अजिबातच आवडलेली नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रैना चेन्नईसाठी पुन्हा खेळणार नाही, याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित पुढील मोसमाआधी चेन्नई त्याला डच्चू देईल आणि खेळाडू लिलावात त्याला दुसरा एखादा संघ खरेदी करू शकेल,’ असेही सूत्रांकडून समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -