घरक्रीडाक्रिस गेलने 'या' कारणासाठी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! 

क्रिस गेलने ‘या’ कारणासाठी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! 

Subscribe

मी भारताचे पंतप्रधान, भारताचे नागरिक आणि भारत सरकारचे आभार मानतो, असे गेल म्हणाला.

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेलने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतासह जगात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनामुळे जगभरात अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी भारताने ‘व्हॅक्सिन मैत्री’ हे अभियान राबवले असून या अभियानाच्या अंतर्गत भारतात तयार झालेल्या कोरोना लसी इतर देशांना पुरवल्या जातात. मागील आठवड्यात ‘मेड इन इंडिया’ कोरोना लशी जमैकाला देण्यात आल्या. त्यामुळे जमैकाचा रहिवासी असणाऱ्या गेलने भारताचे आणि भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

तुमचे आभारी आहोत

‘जमैकाला कोरोना लसीची देणगी दिल्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे नागरिक आणि भारत सरकारचे आभार मानतो. आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमचे खूप धन्यवाद. मी लवकरच भारताला भेट देईन,’ असे गेल म्हणाला. याबाबतचा व्हिडिओ जमैकातील भारतीय दूतावासाच्या ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. त्याआधी काही दिवस विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेलनेही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते. भारताने जमैकाला ५० हजार कोरोना लसी दिल्या आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -