mahmudullah resign : बांगलादेशच्या महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेट मधून घेतला संन्यास; BCB सोबतच्या वादावरून चर्चा

बागंलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून अधिकृतरित्या संन्यास घेतला आहे

बागंलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून अधिकृतरित्या संन्यास घेतला आहे. महमूदुल्लाहने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) दिलेल्या माहितीनुसार म्हटले की, “ज्या घटकाचा मी एवढ्या मोठ्या कालावधीपासून हिस्सा राहिलो आहे त्याला सोडून जाणे सोपे नाही”. असे महमूदुल्लाहने आपल्या साथीदारांना सूचित करताना सांगितले आणि आता कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याची घोषणा केली. बांगलादेश क्रिकेटकडूने याबाबत अधिकृतरित्या सांगितले की महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. तो शेवटच्या वेळी झिंबाब्वेविरूध्द हरारे मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात खेळला होता. त्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने याबाबत संघासोबत चर्चा केली होती त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या.

महमूदुल्लाहकडून झिंबाब्वेविरूध्दच्या चालू सामन्यातून संन्यास घेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांना हे मंजूर नव्हते. तर जुलैमध्ये झालेल्या या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसापासून सर्व खेळांडूनी आपल्या वरिष्ठ खेळाडूला निरोप दिल्यानंतर देखील बीसीबीकडून महमूदुल्लाहच्या निर्णयाला मान्यता मिळाली नव्हती.

एका प्रकाशनात बीसीबीकडून कसोटी सामन्यांत सेवा देण्यासाठी महमूदुल्लाहला धन्यवाद देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये त्याने जुलैमध्ये संन्यास घेण्याची घोषणा केल्याचा उल्लेख केला नव्हता. महमूदुल्लाहचे वक्तव्य देखील यालाच अनुसरून होते जेव्हा त्याने झिंबाब्वेविरूध्दच्या कसोटी सामन्यात आपल्याला स्थान दिल्याबद्दल बीसीबीचे आभार मानले होते. महमूदुल्लाहने सांगितले की, “ज्या घटकाचा मी खूप मोठ्या कालावधीपासून हिस्सा राहिलो आहे त्याला सोडून जाणे सोपे नाही. मी सतत योग्य वेळी योग्य निर्णयाबाबत विचार केला आहे आणि मला वाटते की कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची ही योग्य वेळ आहे. जेव्हा माझे कसोटी संघात पुनरागमन झाले तेव्हा मला बीसीबी अध्यक्षांचे आभार मानायचे होते”.

“मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व माझ्या साथीदारांचे आभार व्यक्त करतो. बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेट खेळणे म्हणजे अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे मी या आठवणी कायमस्वरूपी सोबत ठेवेन. मी कसोटी क्रिकेट मधून संन्यास घेत आहे पण एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये सक्रिय असेन. तर एकदिवसीय क्रिकेटसाठी आपल्या संघाला सर्वश्रेष्ठ योगदान देणे चालू ठेवेन”. असे महमूदुल्लाहने आणखी सांगितले.


हे ही वाचा: PAK vs BAN Test series : पाकिस्तानविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बांगलादेशला झटका; हा स्टार खेळाडू संघाबाहेर