घरक्रीडाभारतात परतताचं हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ, एयरपोर्टवर ५ करोडची २ घड्याळे केली...

भारतात परतताचं हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ, एयरपोर्टवर ५ करोडची २ घड्याळे केली जप्त

Subscribe

भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्याची सध्या निराशाजनक कामगिरी चालली आहे. कमी वेळात हार्दिक पंड्याने क्रिकेटमध्ये नाव कमवले आहे. क्रिकेटसोबत उच्च जीवनशैलीसाठी हार्दिक पंड्या ओळखला जातो. पांड्याकडे अलिशान गाड्या आणि महागडे घड्याळे असून त्याला महागड्या घड्याळांची आवड आहे. अशाच घड्याळांमुळे हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या आहेत. विमानतळावर हार्दिक पंड्याच्या ५ कोटी रुपये किंमत असलेली २ घड्याळे कस्टम विभागाने जप्त केली आहेत. यापुर्वी दुबईमध्ये हार्दिक पंड्याने घड्याळ घातले असल्याचे दिसले होते.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याने विमानतळावर कस्टम विभागाला घड्याळांची माहिती न दिल्यामुळे त्याचे दोन्ही घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही घड्याळांची किंमत ५ कोटी रुपये आहे. आपल्या दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या हार्दिक पंड्याची खराब वेळ सुरु आहे. हार्दिक पंड्याला टी२० वर्ल्डकप नंतर संघातून वगळले आहे. वर्ल्डकप नंतर भारतात परतत असताना हार्दिक पंड्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. विमानतळावर २ घड्याळांच्या खरेदीची माहिती न दिल्यामुळे अखेर कस्टम विभागाकडून २ घड्याळे जप्त कऱण्यात आली आहेत.

- Advertisement -

हार्दिक पंड्याला महागडी घड्याळे वापरण्याची आवड आहे. दुबईवरुन भारतात येत असताना हार्दिक पंड्याकडे २ घड्याळे होती. या घड्याळांची किंमत ५ करोड आहे. हार्दिकने आपल्याकडे घड्याळे असल्याची यापुर्वी माहिती दिली नव्हती. तसेच या घड्याळांच्या खरेदीचे बिल नव्हते. यामुळे कस्टम विभागाने दोन्ही घड्याळे जप्त केली आहेत. हार्दिक पंड्याने काही महिन्यांपुर्वी Patek Philippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ खरेदी केले होते ज्याची किंमत ५ करोड रुपयांहून अधिक आहे.

- Advertisement -

हार्दिक पंड्या जेव्हा पाठीच्या दुखण्यावर रुग्णालयात उपचार घेत होता. तेव्हाही त्याने महागडे सोन्याचे घड्याळ घातले होते. त्याचा फोटोही त्याने शेअर केला होता. मागील वर्षी हार्दिक पंड्याचा भाऊ क्रुणाल पंड्या याच्यावरही काही महागड्या वस्तूंची कस्टम विभागाला माहिती न दिल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. क्रुणाकडूनही काही वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. हार्दिक पंड्या रविवारी संघासोबत भारता आला त्यावेळी त्याच्याजवळ असलेली घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.

हार्दिक पंड्याने फेटाळली घड्याळाची अफवा

हार्दिक पंड्याने घड्याळ जप्त केल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याने घड्याळ्याची किंमत ५ कोटी असल्याचे वृत्त फेटाळले आहे. हार्दिकने ट्विट करत कारवाईची माहिती दिली आहे. हार्दिकने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भारतीय संघासोबत दुबईहून परतत असताना १५ नोव्हेंबरला सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर दुबईहून आणलेल्या सामानाची कस्टम ड्यूटी देण्यासाठी विमानतळावर कस्टम काउंटरवर गेलो होतो. माझ्याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. मी स्वतः सर्व माहिती कस्टम अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच त्यांनी काही कागदपत्रे मागितले होते. सध्या ते वस्तूचे मूल्यांकन करत असून सर्व किंमत मी भरण्यास तयार असल्याचे हार्दिकने म्हटलं आहे.

दरम्यान पंड्याने घड्याळाच्या किंमतीवरही खुलासा केला आहे की, ते घड्याळ १.५ कोटी रुपयांचे आहे. ५ कोटी रुपयांचे असल्याचे खोटे सांगितले जात आहे. मी या देशातील कायद्याचे पालन करणारा नागरिक असून सर्व सरकारी यंत्रणांचा आदर करतो असे हार्दिक पंड्याने म्हटलं आहे.


हेही वाचा : प्रत्येकवेळी टॉस जिंकणाराच कसा काय मॅचचा बॉस असू शकतो? ICC इवेंट्सवर गंभीर सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -