घरIPL 2020IPL 2020 : CSKची पुन्हा सुमार कामगिरी; राजस्थानला १२६ धावांचे आव्हान

IPL 2020 : CSKची पुन्हा सुमार कामगिरी; राजस्थानला १२६ धावांचे आव्हान

Subscribe

कर्णधार धोनीने २८ चेंडूत २८ धावा केल्या. 

चेन्नई सुपर किंग्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यांना आतापर्यंत नऊ पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. आज होत असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पुन्हा एकदा सुमार कामगिरी केली आहे. अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १२५ धावाच करता आल्या. दुसरीकडे राजस्थानच्या गोलंदाजांनी उत्तम खेळ केला. जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवातिया या राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

धोनी, जाडेजाने सावरले

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चेन्नईचे अनुभवी फलंदाज फॅफ डू प्लेसिस (१०) आणि शेन वॉटसन (८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. डू प्लेसिसला आर्चरने, तर वॉटसनला कार्तिक त्यागीने बाद केले. यानंतर अंबाती रायडू (१३) आणि सॅम करन (२२) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. मात्र, कर्णधार धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यांना आक्रमक शैलीत खेळता आले नाही. धोनी २८ चेंडूत २८ धावा केल्यावर धावचीत झाला. जाडेजाने ३० चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत ५ बाद १२५ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -