घरक्रीडाबलाढ्य चेन्नईला हरवून मुंबई फायनलमध्ये

बलाढ्य चेन्नईला हरवून मुंबई फायनलमध्ये

Subscribe

मुंबईने आपले ६ गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला. या विजयासोबतच मुंबईने फायनलमध्ये आपले स्थान निश्चति केले. या विजयात मुंबईच्या गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली. मुंबईच्या गोलंदाजांनी फक्त १३१ धावांवर चेन्नईला थांबवले.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात १२ व्या मोसमाती पहिला प्ले-ऑफचा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने बाजी मारली. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाजांची पळता भुई थोडी झाली. अखेर कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत डाव सावरण्याच प्रयत्न केला. चेन्नईने २० षटकांत ४ बाद १३१ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने १३२ धावांचे माफक आव्हान सहज पुर्ण केले.

चेन्नईने दिलेल्या आव्हानाला सामोरे जाताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक देखील ८ धावांवर बाद झाला. मात्र, सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी डाव सावरत शंभरी गाठली. सुर्यकुमारने आपले अर्धशतक पुर्ण केले. मात्र १०१ धावा झाल्यानंतर किशन बाद झाला. इम्रान ताहिरने किशनचा त्रिफळा उडवला. किशनने ३१ चेंडूत २८ धावा केल्या. त्यानंतर लगेच इम्रानने कृणाल पांड्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजासाठी आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फॅफ डू प्लेसीस अवघ्या ६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर शेन वॉटसन देखील धावबाद झाला. जयंत यादवने सुरेश रैनाचा त्रिफळा उडवला. त्यामुळे रैना देखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने ७ चेंडूत फक्त ५ धावा केल्या. यानंतर मुरली विजय आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील बाद झाला. त्याने २६ चेंडूत २६ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि अंबाती रायडू यांनी भागीदारी करत शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष सुरु ठेवला. त्यामुळे २० षटकांत चेन्नईने १३१ धावांपर्यंत मजल मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -