दत्ता नरळे नवी मुंबई महापौर केसरी, विजय पाटील कुमार केसरी

दत्ता नरळे नवी मुंबई महापौर केसरी, विजय पाटील कुमार केसरी

सोलापूरच्या दत्ता नरळेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपखैरणे येथे झालेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरच्या संतोष गायकवाडवर मात करत नवी मुंबई महापौर केसरी हा किताब पटकावला. याचसोबत त्याला रोख रकमेचे पारितोषिक, चांदीची गदा आणि मानाचा पट्टा मिळाला. नवी मुंबईच्या वैभव रासकरने तिसरा आणि सोलापूरच्या सुनिल खताळने चौथा क्रमांक मिळवला.

महापौर कुमार केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या विजय पाटील या पैलवानाने पुण्याच्या निखील कदम याच्यावर मात करत २१ हजार रकमेच्या पारितोषिकासह चांदीची गदा आणि मानाचा पट्टा पटकावला. सोलापूरचा विश्वजीत पाटील तिसर्‍या आणि कोल्हापूरचा रमेश इंगवले चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

९ वजनी गटांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील पहिल्या ३ क्रमांकाच्या पैलवानांना स्मृतीचिन्हे, रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाच्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत २७७ पैलवान सहभागी झाले होते.