घरक्रीडाIPL 2022 : कोरोनाच्या विळख्यात दिल्लीची टीम, एक खेळाडू पॉझिटिव्ह; पुढे काय...

IPL 2022 : कोरोनाच्या विळख्यात दिल्लीची टीम, एक खेळाडू पॉझिटिव्ह; पुढे काय होणार?

Subscribe

आयपीएल २०२२ चा १५ वा हंगाम मोठ्या दिमाखात सुरू आहे. आतापर्यंत आयपीएलचे जवळपास २७ च्या वरती सामने झाले आहेत. अशातच आता कोरोना विषाणूने यंदाच्या हंगामात प्रवेश केला असून चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच आता एका परदेशी खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना २० एप्रिलला होणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. मात्र खेळाडूंना आता मुंबईतील त्यांच्या हॉटेलमध्येच थांबवण्यात आले आहे. पुढील दोन दिवस दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, धक्कादायक म्हणजे दिल्लीने पुढील सामन्यासाठी पुण्याचा दौरा पुढे ढकलला आहे. २० एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरूद्ध होणारा सामना स्थगित करण्यात आला आहे.

- Advertisement -

जर एखाद्या खेळाडूला किंवा स्टाफला कोरोनाची लागण झाली असेल तर त्या व्यक्तिला ७ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर सहाव्या आणि सातव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. दोन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएलच्या शेवटच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहरही वाढत होता. त्यामुळे बीसीसीआयवर आयपीएल स्थगित करण्याचा दबावही आला होता. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 Points Table : गुजरातचा पाच सामन्यांत धुरळा, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गाठलं पहिलं स्थान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -