घरक्रीडाIPL 2022 Points Table : गुजरातचा पाच सामन्यांत धुरळा, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये...

IPL 2022 Points Table : गुजरातचा पाच सामन्यांत धुरळा, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गाठलं पहिलं स्थान

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामातील सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईकडून गुजरातला १७० धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. ते आव्हान गुजरातने पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर गुजरातने खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

कालच्या झालेल्या सामन्यात फिरकीपटू राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने १७ व्या ओव्हरच्या पहिल्या ४ चेंडूत ३ षट्कार आणि १ चौकार मारला. डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलंय. तर दुसरीकडे राशिदने मैदानात उत्कृष्ट फलंदाजी केली. यावेळी त्याने २१ चेंडूत ४० धावा काढत तीन षट्कार आणि एक चौकार मारला.

- Advertisement -

आयपीएल २०२२ चा पॉइंट्स टेबल

गुणतालिकेत नजर मारल्यास गुजरात टायटन्स हा संघ पहिल्या क्रमांकावर दिसत आहे. गुजरातने एकूण ६ सामने खेळले असून ५ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर १ सामना हातातून गमावला आहे. पॉइंट्स पाहिले असता गुजरातचे एकूण १० पॉइंट्स आहेत. तर रन रेट ०.३९५ इतकं आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या क्रमांकावर, आरसीबी तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या, राजस्थान पाचव्या, कोलकाता सहाव्या, पंजाब सातव्या, दिल्ली आठव्या, चेन्नई नवव्या आणि सर्वात शेवटी जेतेपद पटाकवणारा संघ मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

चेन्नईच्या किती धावा?

चेन्नईने २० ओव्हर्समध्ये १६९ धावा काढल्या आहेत. अंबाती रायडूने ३१ बॉलमध्ये ४६ धावा काढल्या आहेत. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले आहेत. चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने १० बॉलमध्ये ३ धावा काढल्या आहेत. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आऊट झाला. मात्र, चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने ४८ बॉलमध्ये ७३ धावा काढल्या आहेत.


हेही वाचा : दुखापतीमुळे IPL च्या बाहेर; एकही मॅच न खेळलेला चहर BCCI च्या निर्णयाने होणार मालामाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -