घरक्रीडाIPL : कॅप्टन कुल धोनी अश्विनवरही प्रचंड चिडला होता, सेहवागने सांगितला किस्सा

IPL : कॅप्टन कुल धोनी अश्विनवरही प्रचंड चिडला होता, सेहवागने सांगितला किस्सा

Subscribe

धोनीची ओळख कॅप्टन कुल म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची ओळख आहे. मैदानावर सर्वात कमी कोणी रिएक्ट होत असेल तर धोनी. खूपच कमी वेळा महेंद्र सिंह धोनी कोणावर ओरडल्याचा किंवा भडकल्याचा किस्सा समोर आला असेल. पण भारतीय संघाचा माजी ओपनर विरेंद्र सेहवागनेच धोनी रागावल्याचा एक किस्सा शेअऱ केला आहे तो म्हणजे रविचंद्रन अश्विनच्या निमित्ताने. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात घडलेला किस्सा सेहवागने शेअर केला आहे. रवीचंद्रन अश्विनच्या एका चुकीमुळे धोनीचा राग अनावर झाल्याचा किस्सा सेहवानगे सांगितले आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला बाद केल्यानंतर रवीचंद्रन अश्विनचे सेलिब्रेशन धोनीला आवडले नाही. अश्विनच्या सेलिब्रेशनचे मलाही आश्चर्य वाटल्याचे सेहवागने सांगितले आहे. आयपीएल २०१४ च्या क्लालिफायर दोन सामन्याच्या वेळी घडलेली ही घटना आहे.

या सामन्यात अश्विनने ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. ग्लेन मॅक्सवेल पॅव्हिलिअनकडे परतत असताना रवीचंद्रन अश्विनने पिचच्या शेजारची माती उचलली आणि रवीचंद्रन अश्विनच्या दिशेने भिरकावली. मॅक्सवेल परतत असताना अश्विनने ही गोष्ट केली. सेहवागलाही ही गोष्ट पटली नाही. पण ही गोष्ट सार्वजनिकरीत्या समोर आल्यानेच सेहवागनेही याबाबतची नाराजी व्यक्त केली. क्रिकेटसारख्या खेळाच्या स्पिरीटसाठी ही गोष्ट अतिशय अयोग्य असल्याचे मत सेहवागचे होते. या घटनेनंतर धोनीदेखील खूपच चिडला. त्यानंतर धोनी अश्विनला खूप ओरडल्याचाही प्रसंगही सेहवागने शेअर केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही अश्विन आणि मॉर्गनमध्ये वाद झाल्याची घटना ताजी असतानाच सेहवागने २०१४ च्या आयपीएलचा किस्साही सांगितला आहे.

- Advertisement -

सेहवागला वैयक्तिक पातळीवर अश्विनचे सेलिब्रेशन आवडले नाही. पण अश्विनने सार्वजनिक पातळीवर ही गोष्ट करायला नको होती. अश्विनने स्वतःच्या इच्छेने ही गोष्ट केली. त्यामुळे माध्यमांमध्ये किंवा सोशल मिडियावर या गोष्टीचा वादही निर्माण होऊ शकला असता. खरतर अशावेळी जबाबदारीने वागणे ही खेळाडूचीच वैयक्तिक जबाबदारी असते.

एखाद्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडले हे ड्रेसिंग रूममध्येच राहणे गरजेचे असते. पण अशा गोष्टी वारंवार बाहेर येत राहिल्या तर प्रत्येक सामन्याच्या निमित्ताने काही ना काही विषय हा वादाच्या रूपात समोर येतो असे सेहवागने म्हटले आहे. खेळाडूंकडूनही अशा घटना मागे सोडत पुढे जाणे गरजेचे असते. खेळाच्या स्पिरीटसाठी हीच गोष्ट गरजेची असते.

- Advertisement -

अश्विनने त्याच्या सहा ट्विटच्या थ्रेडमध्ये त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. तसेच योग्य गोष्टीच्या बाजुनेही पाठिंबा देण्याचे त्याने आवाहन केले आहे. केकेआरच्या गोलंदाज टीम साऊदी हा अश्विनला बाद केल्यानंतर काहीतरी बोलला. त्यानंतरच अश्विनची प्रतिक्रिया समोर आली. त्या वादात मॉर्गननेही उडी घेतली. पण दिनेश कार्तिकने वेळीच मध्यस्ती केल्याने हा वाद थांबला. अश्विनने दुसरी धाव अचानकपणे घेतल्यानेच केकेआरच्या खेळाडूंना राग आल्याचे दिनेश कार्तिकने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पण केकेआरच्या वतीने याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती असे सेहवाग म्हणतो.

या सगळ्यात दिनेश कार्तिकची चूक असल्याचेही सेहवागने म्हटले आहे. जर मॉर्गन काय बोलला हे जर समोर आले नसते तर हा वाद वाढलाच नसता. खेळात हे सगळ होतच असत अस जर दिनेश म्हणाला असता तर हा वाद पुढे गेलाच नसता. पण दिनेशने काय बोलण्यात आल ते केकेआरच्या खेळाडूंना सांगितले. त्यामुळे कार्तिकने या गोष्टीचा अधिक खुलासा करण्याची गरजच नव्हती, असेही सेहवागने म्हटले आहे.


हेही वाचा – IPL 2021 : Universe Boss क्रिस गेलची IPL मधून माघार, कारण आले समोर

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -