Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा जिल्हा मानांकन टेबल टेनिस ८ ऑगस्टपासून

जिल्हा मानांकन टेबल टेनिस ८ ऑगस्टपासून

Subscribe

नाशिक जिल्हा मानांकन टेबल टेनिस असोसिएशन आयोजित दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. आंतरजिल्हा आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघात निवड होण्यासाठी खेळाडूंना नाशिक जिमखाना, शिवाजीरोड येथे होणार्‍या या स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, युवा मुले-मुली, ज्युनिअर मुले-मुली, सब-ज्युनिअर मुले-मुली, कॅडेट मुले-मुली, सिनियर पुरुष-महिला अशा विविध अकरा गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असणार्‍या खेळाडूंनी आपली नावे जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, पुरुषोत्तम आहेर यांच्याकडे ५ ऑगस्टपर्यंत संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत नोंदवायची आहेत. या जिल्हा मानांकन स्पर्धेत जास्तीतजास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -