घरक्रीडाUS OPEN 2018: जोकोविच तिसऱ्या फेरीत

US OPEN 2018: जोकोविच तिसऱ्या फेरीत

Subscribe

वर्षाचा शेवटचा ग्रँड स्लॅम अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या फेरीत नोवाक जोकोविचने टेन्यस सॅन्डग्रेन याचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

सर्बियायचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने अमेरिकेच्या टेन्यस सॅन्डग्रेन याचा ६-१, ६-३, ६-७, ६-२ असा पराभव केला.

कसा झाला सामना 

जोकोविचने या सामन्याची सुरुवात अप्रतिम केली. त्याने पहिल्या सेटमध्ये सॅन्डग्रेनची सर्विस जोकोविचने ३ वेळा मोडली. तर सॅन्डग्रेनला आपली सर्विस मोडू दिली नाही. त्यामुळे त्याने हा पहिला सेट ६-१ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सॅन्डग्रेनवर दबाव कायम ठेवला. पण तिसऱ्या सेटमध्ये सॅन्डग्रेनने चांगले पुनरागमन केले. त्याने जोकोविचला आपली सर्विस एकदाही मोडू दिली नाही. सॅन्डग्रेनने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. पण जोकोविचने पुन्हा चौथ्या सेटमध्ये अप्रतिम खेळ करत हा सेट ६-२ असा जिंकत सामनाही जिंकला.

निशिकोरीही पुढील फेरीत

जपानचा स्टार बॅडमिंटनपटू काई निशिकोरी यानेही अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. त्याने फ्रान्सच्या गेल मॉनफिल्स याचा ६-२, ५-४ असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे मॉनफिल्सने सामन्यातून माघार घेतली. मॉनफिल्सच्या उजवा हात दुखावल्याने त्याने ही माघार घेतली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -