घरक्रीडाधोनीचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य - डीन जोन्स

धोनीचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य – डीन जोन्स

Subscribe

धोनीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल, असे डीन जोन्स यांना वाटते.

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी एका वर्षाहूनही जास्त काळ क्रिकेट खेळलेला नाही. धोनीने आपला अखेरचा सामना इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात १० जुलै २०१९ ला खेळला होता. त्यानंतर भारतीय संघाने त्याला वगळून युवा रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंतला या संधीचा फारसा फायदा घेता न आल्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने त्याची जागा घेतली. परंतु, राहुल फार काळ यष्टिरक्षणाची धुरा सांभाळू शकेल असे बऱ्याच क्रिकेट समीक्षकांना वाटत नाही. त्यामुळे धोनीचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना वाटते.

धोनीसाठी अजून दार खुले

सध्या भारतीय निवडकर्ते यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पंत आणि राहुल यांना पसंती देत आहेत. धोनीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. मात्र, धोनीने निराशाजनक खेळ केल्यास त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची बंद होतील. धोनीसाठी अजून हे दार खुले आहे. त्याला बराच काळ विश्रांती मिळाली असून ती त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र, खेळाडूचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे पुनरागमन अवघड होते, असे जोन्स एका मुलाखतीत म्हणाले.

- Advertisement -

भारताचा फिनिशर कोण?

धोनी हा महान खेळाडू आहे. महान खेळाडूंना हवे ते करू देण्याची मोकळीक दिली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु, भारतीय संघ राहुल आणि पंत यांना संधी देत आहेत. मात्र, भारताचा फिनिशर कोण? हार्दिक पांड्या? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत धोनीचे पुनरागमन शक्य आहे, असेही जोन्स यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -