घरक्रीडाIPL 2022 : CSK च्या ड्वेन ब्रावोनं रचला इतिहास; IPLच्या 'या' विक्रमाची...

IPL 2022 : CSK च्या ड्वेन ब्रावोनं रचला इतिहास; IPLच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) १५ व्या पर्वाच्या पहिल्याच सामान्यात खेळाडूंनी विक्रमांना गवसणी घालण्यास सुरूवात केली आहे. आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा पहिला सामाना शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात झाला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) १५ व्या पर्वाच्या पहिल्याच सामान्यात खेळाडूंनी विक्रमांना गवसणी घालण्यास सुरूवात केली आहे. आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा पहिला सामाना शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज ड्वेन ब्रावो यानं कोलकाताचा फलंदाज सॅम बिलिंग्सलसा बाद करत आयपीएलमधील १७० विकेट्स पुर्ण केल्या. तसंच, लसिथ मलिंगासोबत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

ड्वेन ब्रावोने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात लसिथ मलिंगा याची बरोबरी केली आहे. मलिंगानं १२२ आयपीएल सामने खेळत १७० विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी मलिंगा हा आयपीएलच्या इतिसाहातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मात्र आता ब्रावोनं त्याची बरोबरी केली आहे. ब्रावोने कोलकाताविरुद्ध १५२ वा सामना खेळताना १७० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

- Advertisement -

कोलकाता विरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्रावोच्या खात्यात आयपीएलमध्ये १६७ विकेट्स होत्या. मलिंगाच विक्रम मोडण्यासाठी ब्रावोला केवळ ४ विकेट्सची गरज होती. मात्र, या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करत २० धावा देत त्यानं ३ गडी बाद केले आणि मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

ब्रावोनं कोलकाताच्या वेंकटेश अय्यरला सातव्या षटकात धोनीच्या हातून झेलबाद करत पहिली विकेट घेतली होती. व्यंकटेश अय्यर १६ धावा करत बाद झाला. त्यानंतर ब्रावोनं २१ धावांवर खेळत असलेल्या नितीश राणाला पव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर २५ धावांवर खेळत असलेल्या बिलिंग्जला बाद करत सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमात अव्वलस्थानी आला आहे.

- Advertisement -

मलिंगा आणि ब्रावोनंतर अमित मिश्रा १६६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पियुष चावलानं १५७ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल 2022च्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनी चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेटनं पराभव केला आहे. सीएसकेनं दिलेल्या १३२ रनचं आव्हान केकेआरनं १८.३ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकात्याची सुरूवात चांगली झाली. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाला ६.२ ओव्हरमध्ये ४३ धावांची सलामी भागीदारी करून दिली. रहाणेनं ३४ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्यानंतर सॅम बिलिंग्सनं २५ धावांची खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यर २० धावांवर नाबाद राहिला.

सीएसकेकडून ड्वॅन ब्राव्होने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनरला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यामध्ये केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.


हेही वाचा – जग जिंकायचय? ‘या’ खेळाडूला करा भारताचा नवा कर्णधार; रवी शास्त्रींचा BCCI ला सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -