Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा FIFA 2018 : तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि बेल्जियममध्ये लढत

FIFA 2018 : तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि बेल्जियममध्ये लढत

इंग्लंड आणि बेल्जियम या दोन्ही संघांचा स्पर्धेतील शेवटचा सामना असल्याने कुणाचा शेवट गोड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे

Related Story

- Advertisement -

आता फिफा विश्वचषक अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे, अंतिम सामन्यात आमने-सामने येणारे दोन्ही संघ जाहिर झाले असून फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यासाठी सर्वच फुटबॉल जगतातून उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. अंतिम सामना जिंकणारा संघ जगजेत्ता ठरेल तर पराभूत होणारा उपविजेता. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिसरा कोण येणार, कारण इंग्लंड आणि बेल्जियम दोघेही एकत्रच सेमा-फायनलमधून बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठी आज इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० सुरू होणार आहे.

england vs belgium
इंग्लंडविरूद्ध बेल्जियम

- Advertisement -

इंग्लंडचा संघ सेमी फायनलमध्ये क्रोएशियाकडून २-१ ने तर बेल्जियमचा संघ सेमी फायनलमध्ये फ्रान्सकडून १-० च्या फरकाने पराभूत झाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्यापासून हुकला.

वाचा- बेल्जियमला मात देत, फ्रान्सची फायनलमध्ये एन्ट्री

- Advertisement -

वाचा- इंग्लंडला मात देत क्रोएशिया अंतिम फेरीत

मात्र या दोन्ही संघांना तिसरे स्थान मिळवण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धेतील शेवटची मॅच असल्याने दोघेही मॅच जिंकण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करताना दिसतील. इंग्लंड संघाचा विचार करता त्यांची संपूर्ण मदार ही त्यांचा कर्णधार हॅरी केनवर असेल तर बेल्जियम संघाला पाहता त्यांच्याकडे दिग्गज खेळाडूंची फौजच आहे. ज्यात हझार्ड, केविन डी ब्रून आणि लुकाकू सारखे खेळाडू आहेत. तर या दोन्ही भारी संघांची आज होणारी स्पर्धेतील शेवटची मॅच कशी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर आज कळेल की इंग्लंड आणि बेल्जियम या दोघांतील कुणाचा शेवट गोड होणार…

- Advertisement -