Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा PSL : प्रत्येक खेळाडूला ‘सिक्स पॅक’ नसतात; डू प्लेसिसने केली पाकिस्तानी क्रिकेटपटूची...

PSL : प्रत्येक खेळाडूला ‘सिक्स पॅक’ नसतात; डू प्लेसिसने केली पाकिस्तानी क्रिकेटपटूची पाठराखण

पाकिस्तानचे माजी कर्णधार मोईन खान यांचा मुलगा आझमची आगामी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या टी-२० संघात निवड झाली आहे.

Related Story

- Advertisement -

क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ‘सिक्स पॅक’ अ‍ॅब्स असण्याची गरज नसते, असे म्हणत दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फॅफ डू प्लेसिसने पाकिस्तानच्या आझम खानची पाठराखण केली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार मोईन खान यांचा मुलगा आझम खानची आगामी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या टी-२० संघात निवड झाली आहे. परंतु, त्याच्या निवडीमुळे वादाला तोंड फुटले आहे. आता क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे १०० किलोहून अधिक वजन असलेल्या आझमची संघात निवड झाल्याचे बऱ्याच चाहत्यांना आवडलेले नाही. परंतु, पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेत आझमसोबत एकाच संघात खेळणाऱ्या डू प्लेसिसने त्याची पाठराखण केली आहे.

दररोज थोडी सुधारणा केली पाहिजे

प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. मी आता बरीच वर्षे क्रिकेट खेळत आहे. माझे वय लक्षात घेता, क्रिकेटपटू म्हणून माझ्या खेळात, माझ्या फिटनेसमध्ये, माझ्या शरीरात कशाप्रकारे सुधारणा होऊ शकेल, याचा मी सतत विचार करतो. आझमला यशस्वी होण्यासाठी माझ्यासारखे दिसण्याची गरज नाही. त्याने केवळ दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा केली पाहिजे, असे ३६ वर्षीय डू प्लेसिस म्हणाला.

क्षमतेचा वापर करणे गरजेचे

- Advertisement -

दोन वेगवेगळ्या खेळाडूंमध्ये तुलना करणे मला आवडत नाही. आझम आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. चेंडू सीमारेषेबाहेर फटकावण्याची त्याच्यात क्षमता आहे. माझी खेळण्याची पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला यशस्वी होण्यासाठी सिक्स पॅकची गरज नसते. तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत, त्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे, असे डू प्लेसिसने सांगितले.

- Advertisement -