घरक्रीडाIPL 2022: "RCB जिंकेल तेव्हाच लग्न करेन", महिला चाहतीचं पोस्टर व्हायरल

IPL 2022: “RCB जिंकेल तेव्हाच लग्न करेन”, महिला चाहतीचं पोस्टर व्हायरल

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात होत आहे. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडिअमवर आयपीएलचा 22वा सामना खेळवला जात आहे.

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात होत आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर आयपीएलचा 22वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीच्या एका महिला चाहतीनं झळकावलेला पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

आरसीबाच्या महिला चाहतीने या पोस्टरमध्ये ‘जो पर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तो पर्यंत लग्न करणार नाही, असं या महिलेनं पोस्टरमध्ये लिहलं आहे. तिच्या या पोस्टरमुळे सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. सध्या चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आयपीएलचा २२ वा सामना खेळला जात आहे.

- Advertisement -

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून बंगळुरूसमोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात चेन्नईचा फलंदाज रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेनं आक्रमक खेळी केली. रॉबिन उथप्पानं 88 तर, शिवम दुबेनं 94 धावा केल्या. चेन्नईच्या कामगिरीसह सोशल मीडियावर आणखी एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आरसीबीच्या एका महिला चाहतीनं झळकावलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. जो पर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरत नाही, तो पर्यंत लग्न करणार नाही, असं त्या महिलेनं पोस्टरमध्ये लिहलंय.

‘हार्दिकनं अर्धशतक झळकावल्यास मी नोकरी सोडेन’

- Advertisement -

काल झालेल्या आयपीएलच्या 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं गुजरात टायटन्सला 8 विकेट्सनी मात दिली. पण या सामन्यात हार्दिक पंड्यानं अर्धशतकानंतर एक नवा किस्सा व्हायरल झाला. मैदानात आलेल्या एका प्रेक्षकानं ‘हार्दिकनं आज अर्धशतक झळकावल्यास मी नोकरी सोडेन’ असा पोस्टर तयार करुन हातात पकडला होता.

त्यावेळी कॅमेरामनने देखील हा पोस्टर टीपला असून आता हार्दिकने अर्धशतक झळकावल्यानंतर या प्रेक्षकाने खरचं नोकरी सोडली का?, आता याचं काय होणार? असे एक न अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले असून विविध मीम्स देखील व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – IPL 2022: दीपक चहरला पुन्हा दुखापत; चेन्नईच्या संघासमोर मोठं संकट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -