घरक्रीडामहाराष्ट्राच्या दोन्ही संघांसह कोल्हापूरची विजयी घोडदौड

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसह कोल्हापूरची विजयी घोडदौड

Subscribe

मुंबईचा श्रेयस राऊळ कर्णधार

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणारी तिसावी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी सुरूवातीला पुण्याच्या अक्षय गणपुले याची पुरुष संघांच्या कर्णधारपदी निवड झाली होती. मात्र मुंबईचा श्रेयश राऊळ याने तीन वेळा पुरुष राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत तर दोन वेळा फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधित्व केले असल्याने व अक्षय पेक्षा अनुभवी असल्याने श्रेयश राऊळला संघ स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी कर्णधारपदी विराजमान केले गेले.

या स्पर्धेत पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या सुयश गरगटेने २:५० मि. संरक्षण करत ३ गडी बाद केले. ऋषिकेश मुर्चावडेने २:१० मि. संरक्षण केले, तर कर्णधार श्रेयश राऊळसह प्रसाद राडीये, गजानन शेंगाळ व सुरेश सावंत यांनी प्रत्येकी २:०० मि. संरक्षण करून प्रत्येकी एक गडी बाद केला व महाराष्ट्राचा विजय सुकर केला. तर पूदूचेरीच्या के. प्रशांत, एम. विमल कुमार व एस. शरथ कुमार यांनीच चांगली खेळी करून सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

पुरुषांच्या दुसर्‍या सामन्यात कोल्हापूरने प. बंगालचा सात मि. राखून १४-१३ (१३-०८, १-५) असा एक गुणाने दणदणीत पराभव केला. कोल्हापूरच्या प्रीतम चौगलेने २:१०, १:१० मि. संरक्षण करत ३ गडी बाद केले. नीलेश पाटीलने २:००, १:३० मि. संरक्षण करत ३ गडी बाद केले व अवधूत पाटीलने १:२० मि. संरक्षण करत ३ गडी बाद केले व कोल्हापूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तर प. बंगालच्या नंदी चिन्मोय (१:१० मि. संरक्षण, १ गडी), अंकुश सरकार (४ गडी), तरुण पाल (२ गडी) यांनीच काय तो प. बंगाल तर्फे किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला.

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने प. बंगालचा १०-०४ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने नाबाद ४:२० मि. संरक्षण करत ३ बळी मिळवले. अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण १ बळी), तर रूपाली बडे व प्राची जटनुरे यांनी प्रत्येकी २:०० मि संरक्षण करत महाराष्ट्राला विजयी सुरवात करून दिली. तर प. बंगालच्या मौसमी तरफदार, अर्पिता मोंडल व एशिता बिस्वास यांनीच थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही यश मिळवता आले नाही. महिलांच्याच दुसर्‍या एका सामन्यात महाराष्ट्राने हरयाणाचा १०-०७ असा एक डाव तीन गुणांनी धुव्वा उडवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -