Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया फुटबॉल वर्ल्डकपमधून बाहेर, २ देशांचा...

Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया फुटबॉल वर्ल्डकपमधून बाहेर, २ देशांचा मॅच खेळण्यास नकार

Subscribe

यूईएफए आणि फीफाच्या अध्यक्षांना आशा आहे की, युक्रेनची परिस्थिती लवकरात लवकर सुधारणा होईल. तसेच फुटबॉल पुन्हा एकदा लोकांमध्ये शांती आणि एकता निर्माण करण्याचा भाग बनेल.

फीफाने पुढील आदेशापर्यंत रशियाला सगळ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलंड, स्वीडन या दोन देशांनी रशियाविरुद्ध फुटबॉल सामने खेळण्याचा नकार दिला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यूईएफएसोबत केलेल्या सखोल चर्चेतनंतर या निर्णयाची घोषणा केली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी बाजूच्या देश युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील अनेक देशांनी रशियाचा विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) जिसने पहले ही आरओसीला आपल्या झेंड्याखाली स्पर्धा करण्यास नकार दिला आहे. तसेच अशी शिफारस केली आहे की, रशिया आणि बेलारुसी एथलीट्सना कोणत्याही आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भाग घेण्यापासून अडवण्यात यावे.

- Advertisement -

फीफा आणि युईएफएने सोमवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अस म्हटलं आहे की, फीफा आणि युईएफएने आज असा निर्णय घेतला आहे की, सर्व रशियन संघांना तसेच ते संघ आंतरराष्ट्रीय असो किंवा क्लब संग असोत त्यांना पुढील सुचना किंवा आदेशापर्यंत फीफा आणि युईएफए या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी घ्यावी लागेल.

फीफा परिषदेच्या ब्युरो आणि यूईएफएच्या कार्यकारी समितीने हा निर्णय स्वीकारला आहे. जी असे गंभीर प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतात. फुटबॉलने एकजूट दाखवली असून युक्रेनमध्ये प्रभावित झालेल्या सगळ्या लोकांसोबत आहे. यूईएफए आणि फीफाच्या अध्यक्षांना आशा आहे की, युक्रेनची परिस्थिती लवकरात लवकर सुधारणा होईल. तसेच फुटबॉल पुन्हा एकदा लोकांमध्ये शांती आणि एकता निर्माण करण्याचा भाग बनेल.

- Advertisement -

रशीयाच्या फुटबॉल संघाला २४ मार्च रोजी विश्व कप क्वालिफाइंग प्ले-ऑफ सेमीफायनल पोलंडविरुद्ध खेळायची होती. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाला वर्षाच्या शेवटी कतारमध्ये होणाऱ्या विश्व कपात जागा मिळवण्यासाठी २९ मार्चला स्वीडन आणि चेक गणराज्य संघाचा सामना करायचा होता. फीफा विश्व कप २१ नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे.


हेही वाचा : Virat Kohli Special: कोहली १०० व्या कसोटीत शतकांचा दुष्काळ संपवणार? श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड नेमका कसा?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -