घरक्रीडाफिफा जागतिक क्रमवारी

फिफा जागतिक क्रमवारी

Subscribe

भारतीय पुरुष संघाला फिफा जागतिक क्रमवारीत दोन स्थानांची बढती मिळाली आहे. त्यामुळे भारत १०३ र्‍या स्थानावरून १०१ व्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या खात्यात १२१९ गुण जमा आहेत.

आशियाई देशांमध्ये भारताचा १८ वा क्रमांक आहे. या संघाने ७ फेब्रुवारीपासून एकही सामना खेळलेला नाही. त्याआधी आशियाई कपमध्ये भारताला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले होते. या स्पर्धेच्या ३ साखळी सामन्यांपैकी २ सामने गमावल्यामुळे भारताला बाद फेरीही गाठता आली नव्हती. त्यानंतर प्रशिक्षक स्टेफन कॉन्स्टँटिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या भारत नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.

- Advertisement -

आशियाई संघांमध्ये इराण क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. ते जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी आहेत. त्याखालोखाल जागतिक क्रमवारीत आशियाई संघामध्ये जपान (२६), दक्षिण कोरिया (३७), ऑस्ट्रेलिया (४१) आणि कतार (५५) यांचा क्रमांक येतो.

बेल्जियम पहिल्या स्थानी कायम

- Advertisement -

फिफा जागतिक क्रमवारीत बेल्जियम संघाने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात १७३७ गुण आहेत. तसेच मागील काही काळात चांगले प्रदर्शन करणारा इंग्लंड संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या क्रमवारीत अव्वल तीन संघांमध्ये बदल झालेला नाही. बेल्जियम पहिल्या स्थानी असून, विश्वविजेता फ्रांस दुसर्‍या तर ब्राझील तिसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी २०२० युरो स्पर्धेच्या पात्रता फेरीत चेक प्रजासत्ताक आणि माँटेनेग्रोचा पराभव केला होता. याचाच त्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी क्रोएशियाला मागे टाकून चौथे स्थान मिळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -