घरक्रीडामागील सात महिने माझ्यासाठी खूप कठीण होते

मागील सात महिने माझ्यासाठी खूप कठीण होते

Subscribe

मागील सात महिने माझ्यासाठी खूप कठीण होते आणि सामनावीराचा हा पुरस्कार या कठीण काळात जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांना समर्पित करतो, असे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पांड्या म्हणाला. काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे हार्दिकवर बरीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने बंदीही घातली होती, पण त्याने माफी मागितल्यानंतर त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. आता मात्र त्याला हे प्रकरण विसरून पुढे जायचे आहे.

माझ्या संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. मागील सात महिन्यांत मला खेळण्याची फार कमीच संधी मिळाली आहे. हा काळ माझ्यासाठी सोपा नव्हता आणि मला काय करावे हे कळत नव्हते. मी फक्त फलंदाजी करत होतो. यापुढे मला फक्त माझ्या खेळात सतत सुधारणा करायची आहे. मी ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला याबाबत खूप खुश आहे, असे हार्दिक म्हणाला.

- Advertisement -

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ८ चेंडूत २५ धावा आणि गोलंदाजीत ३ विकेट घेणार्‍या हार्दिकला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना हार्दिक म्हणाला, मी आधी काही काळ दुखापतीमुळे मैदानापासून दूर होतो आणि नंतर ते प्रकरण घडले. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. या काळात माझे कुटुंब आणि मित्र जे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांना मी हा सामनावीराचा पुरस्कार समर्पित करतो. आता माझे लक्ष्य आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणे आणि भारताला विश्वचषक जिंकवून देणे हे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -